VNI:-
प्रधानमंत्री पिक विमा पावती घरपोच देण्यात येणार; तालुका कृषी अधिकारी कार्यालय चामोर्शी
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/चामोर्शी : केंद्र शासनामार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप २०२२ योजनेतील शेतकऱ्यांना त्यांची विम्याची पावती घरपोच देण्यात येणार आहे. उपक्रमाची सुरवात तालुका कृषी अधिकारी कार्यालय चामोर्शी येथे शेतकऱ्यांना विम्याची पावती देऊन करण्यात आली. हा उपक्रम Agriculture Insurance Company of India Limited
मार्फत संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन १४ सप्टेंबर रोजी तालुका मंडळ अधिकारी श्री. वसंत वळवी यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. यु.जी. बोधे कृषी सहाय्यक, श्री. आर.पी. मडावी कृषी सहाय्यक, श्री. पी .के. वालदे कृषी सहाय्यक, श्रीमती शिवानी येगलोपवार कनिष्ठ लिपिक , श्री. हर्षन किटाळीकर सहाय्यक अधीक्षक, श्री. संतोष नायगमकर पिक विमा प्रतिनिधी, श्री. राम भोयर पिक विमा प्रतिनिधी, श्रीमती. जयमाला शेलारे, श्रीमती. सुभद्रा वालदे, श्री. संजय बोदलकर, श्रीमती. सुमित्रा पिपरे, श्रीमती. लता वाटकोजवार इत्यादी शेतकरी उपस्थित होते.