दि. १६.०५.२०२३
गोंडवाना विद्यापीठात 'हर घर ध्यान अभियान'
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : आझादी का अमृत महोत्सव हा भारत सरकारच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे आणि लोकांच्या, संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास साजरे करण्यासाठी स्मरण करण्याचा हा उपक्रम आहे.
आजादी का अमृत महोत्सवाच्या अंतर्गत संस्कृती मंत्रालयाने आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनच्या सहकार्याने 'हर घर ध्यान' ही मोहिम सुरु केली आहे .
त्याअनुषंगाने 'हर घर ध्यान' हे अभियान गोंडवाना विद्यापीठात आर्ट ऑफ लिव्हिंग गडचिरोली च्या प्रशिक्षक श्रीमती अंजली कुळमेथे यांच्या मार्गदर्शखाली नुकताच आयेजित करण्यात
आला.
योग आणि ध्यान अनेक वर्षांपासुन भारतीय संस्कृतीचा अभिन्न भाग आहे. मात्र काही काळापासुन आधुनिकतेच्या नावावर आपण आपल्या आरोग्याविषयी इतके बेजजाबदार झालो आहोत की समाजाचा मोठा भाग हा मानसिक तणावग्रस्त आहे. सांस्कृतीक मंत्रालयाने या दिशेनं एक सकारात्मक पाऊल " हर घर ध्यान " अभियानद्वारे उचलले आहे.आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातुन " हर घर ध्यान " अभियान देशभरात चालविले जात आहे.
गोंडवाना विद्यापीठाच्या अधिकारी ,शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या कामाचा व्याप मोठा आहे. वेगवान जीवनात, अनेक घटक उच्च-ताणाच्या पातळीत योगदान देतात. तणावाचा केवळ मानसिक आरोग्यावर परिणाम होत नाही तर शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो. ध्यान हा जुना सराव आहे जो तणाव पातळी कमी करण्यासाठी ओळखला जातो. व्यस्त जीवनशैली आणि व्यस्त दिनचर्येमध्ये ध्यानासाठी वेळ काढणे महत्वाचे आहे.१० मिनिटांच्या ध्यान सत्राने तुम्ही तुमचा ताण कसा कमी करू शकता असे मार्गदर्शन या शिबिरात आर्ट ऑफ लिव्हिंग च्या प्रशिक्षक अंजली कुळमेथे यांनी केले. तसेच त्यांनी ध्यानाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी प्रशिक्षक माधुरी दहिकर उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग यांच्या वतीने करण्यात आले.
संचालन आणि आभार या विभागाच्या संचालक डॉ. अनिता लोखंडे यांनी केले. या कार्यक्रमाचा लाभ
विद्यापीठातील सर्व अधिकारी, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी, व पदव्युत्तर शैक्षणिक विभागातील विद्यार्थी यांनी घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सतिश पडोळे, सुधीर पिंपळशेंडे, यांनी सहकार्य केले.