महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता चाचणी परिक्षा (SET Exam) रविवार दि. २६ मार्च, २०२३ ला होणार - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता चाचणी परिक्षा (SET Exam) रविवार दि. २६ मार्च, २०२३ ला होणार

दि. २३.०३.२०२३
Vidarbha News India 
महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता चाचणी परिक्षा (SET Exam) रविवार दि. २६ मार्च, २०२३ ला होणार 
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात येणारी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता चाचणी परिक्षा (SET Exam) रविवार दि. २६ मार्च, २०२३ रोजी गोंडवाना विद्यापीठा अंतर्गत  शिवाजी महाविद्यालय, गडचिरोली, महिला महाविद्यालय, गडचिरोली, शासकीय विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली  पदव्युत्तर शैक्षणिक विभाग, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली व कार्मेल हायस्कुल, गडचिरोली या पाच परिक्षा केंद्रांवर घेण्यात येत आहे. गोंडवाना विद्यापीठ सेट परिक्षा कक्षाव्दारे वरील केंद्रावर सदरहु परिक्षेला एकुण १६२० विद्यार्थी बसणार आहेत.
विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घ्यावे. परीक्षा केंद्रावर कुणीही मोबाईल आणू नये तसेच दिलेल्या वेळेच्या ३० मिनीटे अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहावे. दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करुन शांततामय वातावरणात परिक्षा पार पडेल याची खबरदारी घ्यावी असे आवाहन डॉ. अनिल झेड. चिताडे, संचालक परीक्षा व मुल्यमापन मंडळ तथा समन्वयक सेट परिक्षा, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांनी केले आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->