दि. २३.०३.२०२३
किमान कौशल्य विकास कार्यक्रम व्यवसाय प्रशिक्षण उद्घाटन सोहळा जिल्हाधिकारी संजय मिणा यांच्या हस्ते संपन्न
कार्यक्रमाअंतर्गत ज्युनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, अप्लिकेशन डेव्हलपर वेब अँड मोबाईल या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन जिल्हाधिकारी संजय मिणा यांच्या हस्ते
यातून मास्टर ट्रेंनर निर्माण व्हायला हवे : जिल्हाधिकारी संजय मिणा
विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे : प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : टेक्नॉलॉजी बेस जे कोर्सेस विद्यापीठात सुरू केलेले आहेत. ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यां पर्यंत कसे पोहचतील यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या मुलांचे डोळे सांगतात की यातून त्यांना काहीतरी नवीन शिकायचेआहे. कोर्स सुरू करतांना तुमची जी अवस्था आहे , ती कोर्स पूर्ण झाल्यावर राहणार नाही तुम्ही शिकाल, नोकरी करायल, तुमच्या कुटुंबालाही याचा फायदा होईल मोठमोठ्या कंपन्यांमध्ये तुम्हाला चांगले संधी यातून मिळू शकेन पण यातून मास्टर ट्रेनर निर्माण झाले पाहिजेत आणि आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे , प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्या सहकार्याने हे प्रशिक्षण वर्ग सुरू शक्य झाल्याचेही ते म्हणाले.
गोंडवाना विद्यापीठ आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने किमान कौशल्य विकास कार्यक्रमा अंतर्गत ज्युनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, अप्लिकेशन डेव्हलपर वेब अँड मोबाईल या प्रशिक्षण वर्गाचा उद्घाटन सोहळा आज गोंडवाना विद्यापीठात पार पडला.यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
या प्रसंगी अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, जिल्हा रोजगार आणि मार्गदर्शन केंद्राचे साहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे, कार्यक्रम अधिकारी गणेश चिमणकर, लर्न कोचचे संचालक मनीष तिवारी, समन्वयक कौशल्य विकास कार्यक्रम प्रा.संदीप कागे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्ष स्थानावरून बोलतांना प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यातील लोकांनी कसे पुढे यावे ,या कोर्सेस मुळे चांगले मानव संसाधन कसे निर्माण करता येईल. यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत .ज्ञान देण आमचं काम आहे .या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण संधीचे सोनं करावे.गोंडवाना विद्यापीठ आणि जिल्हा प्रशासन तुमच्या सोबत आहे. असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी केले. या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने लाभ घेतला.
यानंतर मॉडेल कॉलेज च्या संगणक लॅबचेही उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. रजनी वाढई यांनी तर आभार संदीप कागे यांनी मानले.