पुन्हा अस्मानी संकट, शुक्रवारपासून जोरदार वाऱ्यासह गारपिटीचीही शक्यता; तुमच्या जिल्ह्यात पावसाची काय स्थिती? वाचा काय म्हटलंय हवामान विभागानं? - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

पुन्हा अस्मानी संकट, शुक्रवारपासून जोरदार वाऱ्यासह गारपिटीचीही शक्यता; तुमच्या जिल्ह्यात पावसाची काय स्थिती? वाचा काय म्हटलंय हवामान विभागानं?

दि. २३.०३.२०२३

Vidarbha News India

State Rain | पुन्हा अस्मानी संकट., शुक्रवारपासून जोरदार वाऱ्यासह गारपिटीचीही शक्यता; तुमच्या जिल्ह्यात पावसाची काय स्थिती? वाचा काय म्हटलंय हवामान विभागानं?

पुढील काही दिवसात राज्यातील काही भागात म्हणजे ठाणे, विदर्भ, मराठवाड तसेच कोकण, मुंबई व उपनगरात तसेच गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात गारपीट आणि विजेच्या कडकड्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

विदर्भ न्यूज इंडिया

मुंबई- राज्यात पुन्हा एकदा अवकळीचे संकट येणार असून, अस्मानी संकटामुळं बळीराजा अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, विदर्भ, कोकण उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला अवकाळी पावसाने गेल्या काही दिवसांपासून झोडपलं आहे. तर दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावासाची मुंबईत एन्ट्री झाली होती. मुंबईसह उपनगरांमध्ये, ठाण्यात आणि कल्याण डोंबिवलीत सोमवारी व मंगळवारी जोरदार पाऊस पडला. राज्यात (State) हवामान बदलामुळं व सततच्या वातावरणातील बदलामुळं (Weather change) अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर आजार बळावत आहेत. मागील पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरणासह गारपीट तसेच मुसळधार पावसाने (Rain) हजेरी लावली. पश्चिमी विक्षोभामुळे आर्द्रतायुक्त वाऱ्यांच्या प्रभावाने अवकाळीची स्थिती निर्माण झाल्याने, राज्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे. अनेक जिल्ह्यांत गारपिटीमुळे शेतमालासह मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे शेतकरी सरकार दरबारकडून मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.

पुढील 24 तास गारपीटसह पावसाचा अंदाज

दरम्यान, पुढील काही दिवसात राज्यातील काही भागात म्हणजे ठाणे, विदर्भ, मराठवाड तसेच कोकण, मुंबई व उपनगरात तसेच गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात गारपीट आणि विजेच्या कडकड्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यात मागच्या 24 तासांत कोकण, उत्तर महाराष्ट्रात हलका पाऊस झाला आहे. तर आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे (Rain) ढग घोंगावत आहेत. मागील आठवड्यात महारा‌ष्ट्रातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळं हातातोंडाशी आलेला बळीराजाचा घास पावसाने हिरावून घेतला. अवकाळी पावसामुळे रब्बी पिके धोक्यात आली आहे. काढणीला आलेल्या गहु, हरबरा, मका, तसेच आंबा, फळे आणि पालेभाज्यांना या पावसाचा फटका बसला आहे, हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. मागील काही महिन्यांपासून वातावरणातील (environment) बदल व सातत्याने हवामानातील बदल यामुळं कधी पाऊस, (Rain) तर कधी गारपीठ तर कधी अचनाक थंडी (Cold) सुरु आहे, त्यामुळं याचा आरोग्यावर परिणाम होत असून, यामुळं विकाराचे आजार तसेच अन्य आजार हे बळावत चालले आहेत, तसेच राज्यात काही ठिकाणी पाऊव व गारपीठ झाल्यामुळं त्याचा फटका शेती पिकांना बसला आहे. शेती नुकसानीची भरपाई कधी मिळणार याकडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत.

आजार बळवण्याची शक्यता

अवकाळी पावसामुळे रब्बी पिके धोक्यात आली आहे. काढणीला आलेल्या गहु, हरबरा, मका, तसेच आंबा, फळे आणि पालेभाज्यांना या पावसाचा फटका बसला आहे, हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. मागील काही महिन्यांपासून वातावरणातील (environment) बदल व सातत्याने हवामानातील बदल यामुळं कधी पाऊस, (Rain) तर कधी गारपीठ तर कधी अचनाक थंडी (Cold) सुरु आहे, त्यामुळं याचा आरोग्यावर परिणाम होत असून, यामुळं विकाराचे आजार तसेच अन्य आजार हे बळावत चालले आहेत, तसेच राज्यात काही ठिकाणी पाऊव व गारपीठ झाल्यामुळं त्याचा फटका शेती पिकांना बसला आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->