दि. २१.०३.२०२३
शिक्षकांच्या संपकाळात विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी उच्चशिक्षित युवकांचे योगदान
विदर्भ न्यूज इंडिया
चंद्रपूर : ता. प्र/पोंभूर्णा : अलीकडच्या काळात जिल्हा परिषद शिक्षकांनी जुन्या पेन्शन साठी संप पुकारल्या गेले असल्याने प्रत्येक शाळावरती विपरीत परिणाम होऊन शाळा बुडाल्या जात आहे सर्व शाळा कुलूपबंद ठेवल्याने ओस पडलेल्या स्थितीत असल्याची बाब समोर आली आहे यांपैकीच मुल पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या बेंबाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. सदर शाळा बंद असल्याने येथील सरपंच चांगदेव केमेकर यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये विद्यार्थ्यांना शाळेत लागलेली शिस्त वळन व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवाह कायम टिकून राहावे याच उदात्त हेतूने समाजसेवेचा वसा धारण करीत गावातील उच्चशिक्षित बिएड डिएड धारक युवकांना हाताशी धरून शालेय विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पुढे सरसावल्या गेले आहे त्यांच्या मोलीक कर्तव्याला सलाम ठोकत अनेकांकडून कोतुक केल्या जात विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू ठेवुन विद्यार्थ्यांना विद्यार्जन करीत असल्याने पालक विद्यार्थ्यांना दिलासा मिळत आहे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी हा जो अभिनव शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला त्या उपक्रमात गावचे युवा सरपंच चांगदेव केमेकर , सुहास वाढ ई दिपक कोटगले देविदास धानबोहीवार देवाजी धानबोहीवार इत्यादीनी संकल्पना राबविली होती.