स्वच्छ सर्वेक्षण २०२१ : भामरागड नगरपंचायतीला मिळाला जीएफसी ३ स्टार रँकिंगचा दर्जा
Vidarbha News India
Gadchiroli:-
भामरागड:-
स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ च्या निकालामध्ये भामरागड नगरपंचायतीने कचरा मुक्त शहर म्हणून ३ स्टार रँकिंग पटकाविल्यामुळे विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे २० नोव्हेंबर २०२१ रोजी आयोजीत कार्यक्रमात केंद्रीय नगर विकास विभागाचे सचिव, दुर्गाप्रसाद मिश्रा यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
भामरागड नगरपंचायतीने स्वच्छ सर्वेक्षण-२०१९ मध्ये ७०१ क्रमांक, स्वच्छ सर्वेक्षण- २०२० मध्ये ४१८ व स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये भामरागड नगरपंचायतीने ७८ वा क्रमांक मिळवून भामरागड शहराला जीएफसी ३ स्टार रँकिंगचा दर्जा प्राप्त केला आहे.
कचरा मुक्त शहर म्हणून ३ स्टार रँकिंग भामरागड नगरपंचायतीचा पुरस्कार मुख्याधिकारी, डॉ. सुरज दिलीप जाधव आणि कर निर्धारक व प्रशासकिय अधिकारी आशिष सुरेश बारसागडे यांनी स्वीकारला.
राष्ट्रीय पुरस्कार वितरण कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास मंत्री हरदिप सिंग पुरी, केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास राज्यमंत्री कौशल किशोर, छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री, सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास सचिव दुर्गाप्रसाद मिश्रा हे उपस्थित होते.
भामरागड नगरपंचायतीला मिळालेला हा सन्मान नगरपंचायत क्षेत्रातील सर्व नागरीक व सफाई कर्मचाऱ्यांना समर्पित करत असल्याचे मुख्याधिकारी, डॉ. सुरज दिलीप जाधव यांनी जाहिर केले.
