Vidarbha News India :-
अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा चामोर्शी च्या संयुक्त विद्यमाने दि.२६/११/२०२१ ला जि.प.उच्च प्राथमिक शाळा मुरखळा(माल) येथे भारतीय संविधान दिन विवीध उपक्रमाद्भारे मोठ्या आंनदात व उत्साहात संपन्न !*
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेतील मुख्याध्यापक श्री गणेश बोईनवार,प्रमुख अतिथी पदवीधर विषय शिक्षक तथा अनिस शाखा चामोर्शी चे अध्यक्ष श्री रघुनाथ भांडेकर,जेष्ठ शिक्षक श्री रमेश गेडाम,सहा.शिक्षक श्री चंद्रकांत वेटे ,श्री जगदिश कळाम ,श्री राजकुमार कुळसंगे,श्री अशोक जुवारे,श्री कमलाकर कोंडावार आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच शाळेतील विद्यार्थी या *संविधान दिन* उत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाळेतील ब-याच विद्यार्थ्यांनी व शिक्षकवृंदानी *संविधान दिनावर* आधारीत आपल्या भाषणातुन प्रकाश टाकला.सर्वप्रथम *".संविधानावर आधारीत.....* गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संविधान दिनानिमित्त शाळेत विवीध स्पर्धांचे/उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.प्रामुख्याने याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या गीतगायन स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,चिञकला स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा/भाषण स्पर्धा,निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.या *संविधान दिन* कार्यक्रमाचे सुञ संचालन श्री जगदिश कळाम यांनी केले तर आभार श्री चंद्रकांत वेटे यांनी मानले.
