Vidarbha News India:-
VNImedia:-
Gadchiroli:-
विद्यार्थ्यांनो,विद्यापीठात मोफत करा पुस्तकाचे वाचन...
Gadchiroli:-
- स्वामी विवेकानंद अभ्यासिकेला सुरुवात : ऑनलाईन/ ऑफलाईन नोंदणी सुरू...
वाचन संस्कृती वाढविणे आणि टिकवण्यासाठी अभ्यासिकेची गरज असते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संकल्पनेतून गडचिरोली परिसरातील शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची मोफत सुविधा विद्यापीठाने सुरू केली आहे. स्वामी विवेकानंद अभ्यासिका असे या अभ्यासिकेचे नामकरण करण्यात आले असून ती दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ परिसरात सुरू राहणार आहे.
गडचिरोली परिसरात विविध शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी विद्यापीठात या अभ्यासिकेची सुरुवात करण्यात आली.
याचे उद्दिष्ट व सामाजिक बांधिलकी जपत गोंडवाना विद्यापीठाचा सांस्कृतिक वारसा जपण्याचे कार्य या उपक्रमाच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोफत अभ्यासिकेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे आणि कुलसचिव डॉ. अनिल चिताडे यांनी केले आहे.
सोमवारपासून विद्यापीठातील या अभ्यासिकेसाठी नाव नोंदणीला सुरुवात होत आहे. त्यासंदर्भातील फॉर्म विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
इच्छुक विद्यार्थ्यांनी अभ्यासिका नोंदणी करत अभ्यासिका समन्वयक डॉ. अरुंधती निनावे किंवा सहसमन्वक डॉ. एस.व्ही. सुदेवाड (९७६२४६८१५१) यांच्याशी संपर्क साधावा, असे विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकारी वर्षा कोल्हे यांनी कळविले.
अभ्यासिकेची ठळक वैशिष्ट्ये
- विद्यार्थ्यासाठी दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत अभ्यासिका सुरू राहील.
- अभ्यासिकेत प्रवेश विनामूल्य असून नोंदणी करणे आवश्यक आहे.
- नोंदणी अर्ज विद्यापीठाच्या संकेतस्थळावर १७ जानेवारीपासून उपलब्ध होतील.