गडचिरोली जिल्ह्यातील कुलदीप कुनघाडकरची आय. आय. टी मुंबई येथे संशोधक वैज्ञानिक म्हणून निवड... - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गडचिरोली जिल्ह्यातील कुलदीप कुनघाडकरची आय. आय. टी मुंबई येथे संशोधक वैज्ञानिक म्हणून निवड...

Vidarbha News India:-
vnimedia:-
गडचिरोली जिल्ह्यातील कुलदीप कुनघाडकरची आय. आय. टी मुंबई येथे संशोधक वैज्ञानिक म्हणून निवड...

गडचिरोली जिल्ह्यातील मारकबोळी येथील कुलदीप मोहन कुनघाडकरची देशातील नामांकीत आय.आय.टी, मुंबई येथे संशोधक वैज्ञानिक म्हणून निवड झाली असून महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा चंद्रपुर विभागातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, 
कुलदीपचे १२ पर्यंतचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय, घोट येथे झाले, धरमपेठ एम.पी देव कॉलेजमधून त्याचे पदवीचे शिक्षण झाले आणि त्यानंतर नामांकित इस्टिट्यूट ऑफ सायन्स मधून त्याने भौतिकशास्त्त्रात पदव्युत्तराचे शिक्षण पूर्ण केले. 
शेतकरी कुटूंबातून येणाऱ्या कुलदीपने प्रचंड मेहनत घेऊन आपले शिक्षण पूर्ण केले.

परिस्थिती हालाकीची असल्यामुळे त्याने प्रसंगी मनरेगाच्या योजनेचे सुद्धा अनेक काम केले आहे. गावातील लहान विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवा यासाठी तो सतत प्रयत्नशील होता.
आय.आय.टी, मुंबईत निवड होण्यापूर्वी 'एज्युकेट गडचिरोली' या फेलोशिपसाठी सुद्धा त्याची निवड झाली होती आणि त्याने काही महिने कूरखेडा तालुक्यातील आश्रम शाळेत फेलो म्हणून अत्यंत प्रभावी काम केले.आय.आय.टी, मुंबईच्या  प्रयोगिक सुष्मतरंग इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग आणि अनुसंधान संस्था या प्रकल्पासोबत तो संशोधक वैज्ञानिक म्हणून काम करणार आहे. कुलदीप बालपणापासूनच फार मेहनती आणि होतकरू होता, मागास समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील कुलदीपची वैज्ञानिक म्हणून निवड होणे ही फार भूषणावह बाब आहे असे अँड. बोधी रामटेके यांनी सांगितले आणि नवोदय मित्र परिवाराकडून त्याचे अभिनंदन केलें. तसेच जवाहर नवोदय विद्यालय घोट येथील शिक्षकरुंद कर्मचारी व प्राचार्यांनी कुलदीप कुनघाडकर चे कौतुक केलें.



गडचिरोली जिल्ह्यातील मारकबोडी येथील कुलदीप कुनघाडकर देशातील नामांकित आय.आय.टी मुबंई येथे संशोधक वैज्ञानिक म्हणून निवड झाली. कुलदीपचे 12 वि पर्यंत शिक्षण घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयात झाले. धरमपेठ एम. पी देव कॉलेजमधून त्याचे पदवीचे शिक्षण झाले, आणि त्यानंतर नामांकित इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स मधून त्याने भौतिक शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलें. शेतकरी कुटूंबातून येणाऱ्या कुलदीपने प्रचंड मेहनत घेऊन आपले शिक्षण पूर्ण केले आहे. गावातील लहान विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवा यासाठी तो सतत प्रयत्नशील होता. आय.आय.टी, मुंबईत निवड होण्यापूर्वी 'एज्युकेट गडचिरोली' या फेलोशिपसाठी सुद्धा त्याची निवड झाली होती आणि त्याने काही महिने कूरखेडा तालुक्यातील आश्रमशाळेत फेलो म्हणून अत्यंत प्रभावि काम केले. आय. आय. टी मुंबईच्या प्रायोगिक सुष्मतरंग इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग आणि अनुसंधान संस्था या प्रकल्पासोबत तो संशोधक वैज्ञानिक म्हणून काम करणार आहे. कुलदीप बालपणापासून फार मेहनती आणि होतकरू होता. मागास समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील कुलदीपची वैज्ञानिक म्हणून निवड होणे ही फार भूषणावह बाब आहे असे अँड. बोधी रामटेके यांनी सांगितले आणि नवोदय मित्र परिवाराकडून त्याचे अभिनंदन केलें.

Share News

copylock

Post Top Ad

-->