अनाथांची माय सिंधुताई सपकाळ याचं पुण्यात निधन...! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ याचं पुण्यात निधन...!

Vidarbha News India:-
अनाथांच्या माय सिंधुताई सपकाळ याचं पुण्यात निधन...!


अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांंचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ७३ वर्षांच्या होत्या, रात्री ८ वाजून १० मिनिटांनी निधन झाले. पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये निधन झाले, महिना भरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे. त्यांना २०१२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता तर २०२१ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

त्या ७५ वर्षे वयाच्या होत्या.मुळच्याच बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकता आलं होतं. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचं लग्न झालं होतं. त्यांच्या आयुष्यातील संघर्षाने त्यांना समाजसेवेकडे वळवलं. अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती.

१९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते.

शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. अशी सुमारे १०५० मुले या संस्थेत राहिलेली आहेत.


Share News

copylock

Post Top Ad

-->