ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन

ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन


Vidarbha News India:-
VNImedia:-
 
 बजाज ऑटोमाबईलचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे वयाच्या 83 व्या वर्षी उपचारादरम्यान निधन झाले आहे.  बजाज हे गेल्या काही काळापासून  कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी  श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली. 
राहुल बजाज यांच्यावर पुण्यात उपचार सुरु होते. मात्र त्यांची रुबी हॉल क्लिनिकध्ये प्राणज्योत माळवली. राहुल बजाज यांच्या जाण्याने उद्योगक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.  त्यांच्या जाण्याने विविध क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.
राहुल बजाज यांनी 1965 मध्ये बजाज ग्रृपची सूत्र हातात घेतली.
राहुल बजाज यांच्या नेतृत्वात बजाज ग्रृपचा टर्नओव्हर हा 7. 2 कोटींवरुन थेट 12 हजार कोटीवर जाऊन पोहचला. बजाज स्कूटर विकणारी देशातील अव्वल ग्रृप म्हणून नावारुपास आला. त्यानंतर 2005 मध्ये ग्रृपची जबाबदारी त्यांचे पुत्र राजीव बजाज यांना देण्यात आली. 
तेव्हा राहुल बजाज यांनी राजीव यांना मॅनेजिंग डायरेक्टर पदाची जबाबदारी सोपवली होती. यानंतर ऑटोमोबाईल क्षेत्रात बजाज कंपनीच्या विविध प्रोडक्ट्सची देश-विदेशातून मागणी वाढीस लागली. 
राहुल बजाज यांच्या निधनाने नेटीझन्स त्यांना श्रद्धांजली देत आहेत. अनेकांनी बजाजच्या वाहनांची आठवणही सोशल मीडियावर पोस्टद्वारे शेअर केली आहे. 'हमारे बजाज नही रहे', अशा त्यांच्याच जाहीरातीच्या शब्दातच राहुल बजाज यांना श्रद्धांजली दिली आहे.  

Share News

copylock

Post Top Ad

-->