Vidarbha News India:-
VNImedia:-
टीईटी परीक्षेतील घोटाळा प्रकरणी ३ एजंटाना बेड्या...
यापुर्वी पुणे सायबर पोलिसांना तपास करताना टीईटी परीक्षेतील घोटाळ्याची लिंक लागली होती. त्यानंतर टीईटी परीक्षेत घोटाळा करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यांना, एजंट आणि परीक्षेची जबाबदारी असणाऱ्या जीएस.
सॉफ्टवेअरच्या बड्या लोकांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी अधिक तपास सुरू असताना पुणे पोलिसांनी नाशिक, बुलडाणा आणि लातूर परिसरात छापे मारून या तीन दलालांना अटक केली. मुकुंदा जगन्नाथ सूर्यवंशी (वय 33, रा. नाशिक), कलीम गुलफेर खान (वय 52, रा. बुलढाणा), जमाल इब्राहिम पठाण (वय 40, रा. लातूर) अशी अटक केलेल्या दलालांची नावे आहेत.
टीईटी 2018 मध्ये आरोपी मुकुंदा सूर्यवंशी याने अपात्र उमेदवारांना पात्र करण्याचे आमिष दाखवून तब्बल 80 लाख रुपये एजंट हरकळ बंधूंना दिल्याचे सांगितले आहे. तर, त्याशिवाय 2019 च्या टीईटी परीक्षेत 1 कोटींवर रक्कम पोहोच केली आहे.
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेले एजंट संतोष हरकळ व अंकुश हरकळ यांनी नाशिक, जळगाव, जालना, बुलडाणा जिल्ह्यातील पाच एजंटाकडून हे पैसे जमा केले होते. त्यानंतर डॉ. देशमुख आणि सावरीकर यांच्या सांगण्यावरून ते अश्विनीकुमार याला देण्यात आले.