बारावीच्या प्रश्नपत्रिकेत चूक : विद्यार्थ्यांना प्रत्येकी १ गुण मिळणार - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

बारावीच्या प्रश्नपत्रिकेत चूक : विद्यार्थ्यांना प्रत्येकी १ गुण मिळणार

Vidarbha News India:-
VNImedia:-
बारावीच्या प्रश्नपत्रिकेत चूक : विद्यार्थ्यांना प्रत्येकी १ गुण मिळणार


नागपूर : बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला कालपासून सुरुवात झाली आहे. त्याच दरम्यान काल काल बारावीची परीक्षेत इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये 1 गुणांचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आला होता. त्या एका प्रश्नाचा 1 गुण विद्यार्थ्यांना मिळणार असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून सांगण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीनंतर ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक 1) A) 5 हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांना बोर्डाकडून एक गुण अधिकचा दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. इंग्रजी पेपर मध्ये बोर्डाकडून चूक झालेल्या आणि विद्यार्थ्यांने सोडवलेल्या एका प्रश्नाचा 1 मार्क विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे .

दरम्यान, राज्यातील 9 हजार 635 परीक्षा केंद्रावर 14 लाख पेक्षा अधिक विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत.

कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली जात आहे. एका वर्गात 25 विद्यार्थी बसवत परीक्षा केंद्रांवर 12वीच्या परीक्षेला सुरूवात झाली आहे. या परीक्षा 7 एप्रिल पर्यंत चालणार आहेत.

Share News

copylock

Post Top Ad

-->