महाज्योती संस्थेमार्फत सावित्रीबाई फुलेंच्या जन्मगावी मुलींसाठी निवासी प्रशिक्षण केंद्र; २४ कोटींची मान्यता - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

महाज्योती संस्थेमार्फत सावित्रीबाई फुलेंच्या जन्मगावी मुलींसाठी निवासी प्रशिक्षण केंद्र; २४ कोटींची मान्यता

महाज्योती संस्थेमार्फत सावित्रीबाई फुलेंच्या जन्मगावी मुलींसाठी निवासी प्रशिक्षण केंद्र; २४ कोटींची मान्यता

Vidarbha News India:-
VNImedia:-
महाज्योती संस्थेमार्फत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या  जन्मगावी मुलींकरिता निवासी प्रक्षिण केंद्रास २४ कोटी रुपयांची तरतूद

- इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार

महाज्योती ही स्वायत्त संस्था असून विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग तसेच इतर वंचित व दुर्लक्षित घटकातील युवक व युवतींसाठी विविध उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी महाज्योती या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.


सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगांव मौजे नायगांव येथे (naygoan) येथे महाज्योती (mahajyoti) संस्थेमार्फत २०० मुलींसाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) (NDA) व अन्य स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी निवासी स्पर्धा प्रशिक्षण संकुल उभारण्यास तसेच इतर सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून घेऊन प्रशिक्षण केंद्र सुरु करणे व चालविणे यासाठी २४ कोटी रूपयांची तरतूद केल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी दिली.

मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले महाज्योती अंतर्गत २०० मुलींसाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) व अन्य स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी निवासी स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण संकुल उभारण्याचा राज्य शासनाचा विचार हाेता. त्यास आता मुर्तस्वरुप आले आहे. सात मार्चला शासनाने यासाठी २४ काेटींची तरतूद केली आहे.

महाज्योतीच्या प्रस्तावात १०० विद्यार्थिनींची निवास व्यवस्था करणे यासाठी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील उजव्या बाजूस खुल्या जागेत १०० विद्यार्थिनीकरिता ५० रूम बांधण्यासाठी ३० लाख रूपये, ५० रुममध्ये प्रत्येकी दाेन टेबल, खुर्च्या, कपाट, कॉट गाद्यांकरिता पाच लाख रूपये, इमारत डागडुजी बाथरूम, रंगकाम, इलेक्ट्रीक व इतर बाबी (CCTV, अग्नीशमन यंत्रणा, इत्यादी) या करिता अंदाजित दहा लाख रूपये, कार्यालयीन सोयी-सुविधा व उपकरणे, टेबल, खुर्च्या, कपाट, संगणक, इंटरनेट सुविधा, रंगकाम, इलेक्ट्रिकल व इतर बाबी (CCTV, अग्नीशमन यंत्रणा, इत्यादी) याकरिता १० लाख रूपये, मेस ऊभारणी, डायनिंग टेबल, खुर्च्या सेट, केटरर्स व्यवस्था जेवणथाळ्या वाट्या, ग्लास, चमचे इत्यादी साहित्यसंपूर्ण व्यवस्था करणे याकरिता अंदाजित १० लाख रूपये, डिजिटल क्लासरुम व्यवस्था, 3 क्लासरूम मधील डेस्क बेंच, प्रोजेक्टर, Inter- active पॅनेल, टेबल, इंटरनेट सुविधा व इतर बाबी १० लाख रूपये देण्यात येणार आहेत.

याबराेबरच वाचनालय व अभ्यासिका ५० बैठक व्यवस्थेसह टेबल, खुर्च्या, पुस्तक कपाट, संगणक, इंटरनेट सुविधा, रंगकाम, इलेक्ट्रिकल व इतर बाबी (CCTV, अग्नीशमन यंत्रणा, इत्यादी याकरिता अंदाजित २० लाख रूपये, वाचनालय व अभ्यासिका करीता पुस्तक खरेदी, अभ्यासिकेकरिता २० लाख रूपये, प्रशिक्षणासाठी मैदान व्यवस्था तयार करण्यासाठी अंदाजित १० लाख रूपये, सुसज्ज व्यायाम शाळा बांधणी, व्यायाम शाळा उभारणी व साहित्य खरेदी करणे या करिता १० लाख रूपये,सभागृह बांधणी, प्रेक्षागृह उभारणी व इतर आवश्यक बैठक व्यवस्था व साउंड व्यवस्था याकरिता ४५ लाख रूपये, प्रशिक्षणासाठी नवीन जमीन खरेदी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेच्या शेजारी लागून असलेली मोकळी जागा याकरीता ६० लाख रूपये असे एकूण सर्व कामांसाठी एकूण अंदाजित खर्च २४ कोटी रूपयांची मान्यता देण्यात आली आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->