डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती राज्यभर उत्साह ; मुख्यमंत्र्यासह दिग्गजांचे अभिवादन - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती राज्यभर उत्साह ; मुख्यमंत्र्यासह दिग्गजांचे अभिवादन


Vidarbha News India:-
VNI:-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती राज्यभर उत्साह ; मुख्यमंत्र्यासह दिग्गजांचे अभिवादन

Babasaheb Ambedkar jayanti 2022: 
भारतीय संविधानाचे निर्माते आणि माणसाला माणसासारखं जगायचा मंत्र देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 131 वी जयंती आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आज मुंबईत चैत्यभूमीवर तसंच नागपुरात दिक्षाभूमीवर लाखो अनुयायी जमतायत. 


मुंबई: Babasaheb Ambedkar jayanti 2022: भारतीय संविधानाचे निर्माते आणि माणसाला माणसासारखं जगायचा मंत्र देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 131 वी जयंती आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आज मुंबईत चैत्यभूमीवर तसंच नागपुरात दिक्षाभूमीवर लाखो अनुयायी जमतायत. त्यासाठी प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवलीय. कोरोनामुळे गेले २ वर्ष बाबासाहेबांची जयंती साजरी करता आली नव्हती. मात्र आता निर्बंध उठल्यामुळे राज्यात धुमधडाक्यात बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात येत आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमीवर जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं. यावेळी त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते..

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांची 131वी जयंती आहे..नाशिकरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन जयंती उत्सवाला सुरुवात झाली..बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिवाजीरोडवरील पूर्णाकृती पुतळ्यास पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अभिवादन केले..

Share News

copylock

Post Top Ad

-->