चंद्रपुरात आढळला विदर्भातील मोठा प्राचीन लोह कारखाना : आठशे वर्षांपूर्वीचा असण्याची शक्यता - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

चंद्रपुरात आढळला विदर्भातील मोठा प्राचीन लोह कारखाना : आठशे वर्षांपूर्वीचा असण्याची शक्यता

चंद्रपुरात आढळला विदर्भातील मोठा प्राचीन लोह कारखाना : ८०० वर्षांपूर्वीचा असण्याची शक्यता

चंद्रपूर : आठशे वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या लोह कारखान्याचे पुरावे चंद्रपूर जिल्ह्यात सापडले. विदर्भातील हा सर्वात मोठा कारखाना असावा. परमार काळात या कारखान्यात अवजारे व इतर वस्तू तयार केली जात असावी, अशी शक्यता भूगर्भशास्त्र तथा पुरातत्व अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी वर्तविली आहे. जवळपास एक कि.मी. परिसरात या कारखान्याचे अवशेष आढळून आले आहेत.
चंद्रपूर इथून पंधरा कि.मी. अंतरावर घंटाचौकी नावाचे खेडे आणि प्राचीन प्रसिद्ध शिव मंदिर आहे. याच मंदिर परिसरात तब्बल एक कि.मी. परिसरात 800 वर्षांपूर्वी लोह अवजारे बनविण्याचा प्राचीन कारखाना येथील भूगर्भशास्त्र आणि पुरातत्व अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांना आढळला आहे.
हे मंदिर आणि इतर मंदिरे बांधतेवेळी दगड फोडण्यासाठी लागणारी छिन्नी आणि इतर अवजारे बनविण्यासाठी मातीचे साचे आणि गाळलेले लोखंड येथे मोठ्या प्रमाणावर आढळले. 
हा लोह कारखाना अकरा अथवा बाराव्या शतकातील परमार राज्यांच्या काळातील असल्याचे मत चोपणे ह्यांनी व्यक्त केले. पंधरा वर्षांपूर्वी चोपणे ह्यांना हे स्थळ आढळले होते. मात्र त्यावेळी केवळ गाळलेल्या लोखंडाचे तुकडेच त्यांना सापडले. परत त्यांनी सर्वेक्षण आणि थोडे उत्खनन केले असता, गाळलेल्या लोखंडाची असंख्य लहान मोठे तुकडे, लोखंडाची अवजारे बनविण्यासाठी दोन छिद्राची अनेक मातीचे साचे सापडले. अश्या प्रकारची विविध काळातील लोह कारखाने चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आढळली आहेत. परंतु एक कि. मी. परिसरात पसरलेला हा सर्वात मोठा प्राचीन लोह कारखाना असल्याचे चोपणे म्हणाले. पुढील काळातील राज्यांनी सुद्धा येथील लोह खडकापासून अवजारे बनविली असण्याची शक्यता आहे. अजून इथे नाणी किंवा इतर ऐतिहासिक पुरावे मिळाले नाहीत. मात्र संशोधनाअंती आणि मिळणाऱ्या पुराव्याच्या आधारे ह्या प्राचीन वारस्याची अचूक माहिती समोर येवू शकते.
लोहारा नावाचा इतिहास :
घंटा चौकीचे हे शिव मंदिर नागरी स्थापत्य शैलीनुसार 11/12 व्या शतकात राजा जगदेव परमार (1095-1134) ह्याच्या काळात बांधले गेले होते. परमार राजे हे शिवभक्त असल्यामुळेच त्यांनी आजच्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात अनेक मंदिरे बांधली. त्यात प्रसिद्ध मार्केड मंदिर समूह, सिद्धेश्वर मंदिर समूह, गडचांदूर येथील मंदिर समूह, जुगादचे मंदिर आणि भटाळा येथील भोंडा महादेव मंदिर बांधले होते. ह्या सर्व मंदिरांच्या बांधकामासाठी दगडाना आकार देण्यासाठी छन्नी आणि इतर अवजारे लागत असत.
अवजारांसाठी प्राचीन काळात लोह खनिज असलेल्या दगडापासून भट्टीच्या माध्यमाने तरल लोखंड तयार केले जात असे.. ह्या तरल लोखंडाला साच्यात टाकून विशिष्ट आकाराची अवजारे बनविली जात असे. त्यात छन्नी, हातोडे ह्यांचा समावेश असते. परंतु ह्यासाठी लोह खनिजे असलेल्या ठिकाणाचा शोध घेवून तिथे अशा दगडाना भट्टीत उच्च तापमानात तापवून तरल लोह बनविली जात.
ही तरल धातू योग्य मापाच्या साच्यात ओतून अवजारे बनविली जात. आजचा लोहारा आणि घंटाचौकी परिसर हा अश्या लोह खनिज असलेल्या दगडांनी समृद्ध आहे. बहुदा ह्यामुळेच जवळच्या गावाला लोहारा हे नाव पडले असावे. या भागात उत्खनन झाल्यास या भागाचा इतिहास जगासमोर येवू शकतो, अशी माहिती -
प्रा. सुरेश चोपणे यांनी वर्तविली आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->