गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक प्रवीण मुंजमकार यांच्या नवोउपक्रमाचे सर्वत्र कौतुक - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक प्रवीण मुंजमकार यांच्या नवोउपक्रमाचे सर्वत्र कौतुक


Vidarbha News India:-
VNI:- 
गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक प्रवीण मुंजमकार यांच्या नवोउपक्रमाचे सर्वत्र कौतुक 

गडचिरोली : 
जिल्हा शिक्षण व प्रक्षिण संस्था  गडचिरोलीच्या वतीने सत्र २०२१- २२ मध्ये घेण्यात आलेल्या नवोउपक्रम स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक शिक्षकांकडून उत्कृष्ट पाच प्रथम क्रमांकाचे नवोउपक्रम निवडण्यात आले, यामध्ये देसाईगंज पंचायत समिती शिक्षक श्री  प्रवीण यादव मुंजमकार सर यांना विशेष म्हणजे कोरोना काळात शाळा बंद असतांना डिजिटल माध्यमातून "शिक्षणाची प्रेरणा व अध्ययन सुरू" या नवोउपक्रमाची विशेष निवड करून त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. 

या कार्यक्रमात सोबतच मनतया बेडके सर एटापल्ली, प्रीती नागवाडे, आशिष येलावार चामोर्शी, प्रमोद खांडेकर सर गडचिरोली, या नवोउपक्रमातील शिक्षकांना गौरव करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून डॉ. विनीत माटे सर प्राचार्य) डाएट गडचिरोली हे होतें, तर प्रमुख पाहुणे म्हणून एग्लोपवार मॅडम, अघोर सर गडचिरोली- अधिव्याख्याता, हे होते ,यासोबतच संपूर्ण डाएट टीम उपस्थित होती, प्रवीण मुंजमकार यांनी आपले यशाचे श्रेय चापले सर गट शिक्षण अधिकारी देसाईगंज , बुद्धे सर केंद्रप्रमुख, व संपूर्ण टीम यांना दिले.  यामध्ये कोरोना काळात शाळा बंद असतांना विद्यार्थ्यांनची शिक्षणाची ओढ तुटू नये म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास शंभर ऐतिहासिक , भौगोलिक, संस्कृतिक स्थळांना भेटी देऊन त्यांचा इतिहास, भूगोल अभ्यासून व्हिडीओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात आले. आपल्या शिक्षकांनी  व्हिडिओ तयार केले असल्याने विद्यार्थी आवडीने बघत व  विषयासबंधी गोडी निर्माण होऊन विद्यार्थी अभ्यास करायला प्रेरित झाले तसेच व्हिडिओ च्या माध्यमातून अगदी मनोरंजन पध्दतीने विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण झाली.

Share News

copylock

Post Top Ad

-->