कमलापुर येथील हत्तींचे गुजरात राज्यात होणारे स्थलांतरन थांबवावे;- जिल्हा काँग्रेस कमिटी - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

कमलापुर येथील हत्तींचे गुजरात राज्यात होणारे स्थलांतरन थांबवावे;- जिल्हा काँग्रेस कमिटी

Vidarbha News India:-
VNI:-
कमलापुर येथील हत्तींचे गुजरात राज्यात होणारे स्थलांतरन थांबवावे ; जिल्हा काँग्रेस कमिटी

- अन्यथा तीव्र आंदोनल करण्याचा माझी जि. प. सदस्या तथा जिल्हा महिला कांग्रेस अध्यक्षा सौ. रुपालिताई संजय पंदिलवार आणि जिल्हा कांग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचा इशारा...

गडचिरोली : कमलापुर हत्ती कॅम्प येथील हत्तींचे गुजरात राज्यात होणारे स्थलांतरन थांबवावे. अन्यथा तीव्र आंदोनल करण्याचा इशारा माजी जि. प. सदस्या तथा जिल्हा महिला कांग्रेस अध्यक्षा सौ रुपालिताई संजय पंदिलवार यांनी दिला आहे. 
गडचिरोली जिल्हयातील कमलापुर येथील हत्ती कॅम्प हे प्रमुख आकर्षनाचा बिंदु आहे. केवळ गडचिरोली जिल्हयातीलच नव्हे तर चंद्रपुर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, नागपुर पासुन ते तेलंगना राज्यातील विविध पर्यटक नैसर्गिक अधिवासात हत्ती बघण्याकरीता कमलापुर हत्ती कॅम्प येथे दरवर्षी येतात.
आपला गडचिरोली जिल्हा 76 टक्के बनाने व्यापलेला असल्याने विविध प्रकार ची झाडे, वन औषधी, वनस्पती, प्राणी, पक्षी आढळुन येतात व निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी फक्त आपल्या गडचिरोली जिल्हयातीलच नाही तर राज्यातील विविध भागातुन व इतर राज्यातून सुध्दा पर्यटन स्थळ म्हणुन कमलापुर हत्ती कैम्प ला भेट देतात. दरवर्षी पर्यटकांची कमलापुर हत्ती कॅम्प ला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असतांना कमलापुर येथील हत्ती व ताडोबा मधील हत्ती गुजरात राज्यात स्थलांतरीत करणे हे एक प्रकारे हत्ती या प्राण्यावर अन्याय करण्यासारखे आहे.ज्यामुळे पर्यटनास येणाऱ्या असंख्य पर्यटकांचा तसेच वन्यजीव प्रेमींचा नावारुपास आलेल्या कमलापुर हत्ती कॅम्पमध्ये भेट देण्यास येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर परिणाम होऊन पर्यटकांची संख्या कमी होऊ शकते. महाराष्ट्र राज्यातील एकमेव असलेल्या कमलापुर येथील हत्तींची गुजरात राज्यामध्ये स्थलांतरणाची प्रक्रीया लवकरात लवकर थांबवावी व कमलापुर हत्ती कॅम्प मधील हत्तींना योग्य न्याय देण्यात यावा. नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी जि. प. सदस्या तथा जिल्हा महिला कांग्रेस अध्यक्षा सौ.  रुपालिताई संजय पंदिलवार यांनी दिले आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->