VNI:-
मुंबईत राहूनही आमदार डॉ देवरावजी होळी घेतात आपल्या क्षेत्रातील रुग्णांची काळजी
रुग्णांवर चांगले उपचार व्हावेत यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांना स्वतः फोन वरून देतात निर्देश
गंभीर असणाऱ्या रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी आपल्या स्विय सहाय्यका मार्फत घेतात काळजी
गडचिरोली:- जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या योग्य सोयी सुविधा नाहीत त्यामूळे आपल्या रुग्णाला चांगली सेवा मिळावी याकरिता रुग्णांचे नातेवाईक नेहमीच आमदार डॉ देवरावजी होळी यांच्याशी संपर्क करून चांगल्या उपचारासाठी डॉक्टरांना फोन करावे अशी मागणी करतात. मात्र साहेब मुंबईला आहेत हे कळल्यावर आपल्या रुग्णांवर चांगले उपचार कसे होतील याची चिंता व्यक्त करतात.मात्र आमदार डॉ देवरावजी होळी हे जरी मुंबईत असले तरीही ते आपल्या क्षेत्रातील रुग्णांची काळजी प्राथमिकतेने घेवून रुग्णांवर चांगले उपचार व्हावेत यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांना फोन वरून देतात निर्देश
एवढेच नाही तर गंभीर असणाऱ्या रुग्णांवर तातडीनं उपचार मिळाले पाहिजे त्यांचा जीव वाचला पाहिजे यासाठी आवश्यक त्या ठिकाणीं आपल्या स्विय सहाय्यकाला प्रत्यक्ष रुग्णालयात पाठवून रुग्णांची काळजी घेतात
या आठवड्यात आमदार डॉ देवरावजी होळी मुंबई येथे आहेत तरीही त्यांनी आपल्या रुग्णांना चांगले उपचार मिळावे यासाठी प्रयत्न करुन रुग्णांना धीर दिला व उपचार करवून घेतले याबद्दल रुग्णांच्या नातेवाईकांनी आमदार महोदय यांचे आभार मानले आहे.