VNI:-
सामाजिक न्याय विभाग ; मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू
नागपूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणारी शासकीय वसतिगृह, निवासी शाळा सुरु करण्यात आली असून चालू शैक्षणिक सत्राकरीता प्रवेश प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.
चालू शैक्षणिक सत्राच्या रिक्त जागेकरीता वसतिगृह प्रवेश अर्ज भरण्याचे वेळापत्रक समाज कल्याण आयुक्तालयाकडून प्राप्त झाले आहे. ज्या विद्यार्थी व विद्यार्थिंनीना शासकीय वसतिगृहात प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यांनी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, रहाटे कॉलनी, वर्धा रोड येथून अर्ज प्राप्त करुन निर्धारित मुदतीत सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.
वेळापत्रक यानुसार:-
शासकीय वसतिगृहाचे वेळापत्रकानुसार शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी 15 जुलै पर्यंत राहील. पहिली निवड यादी अंतिम करणे व प्रसिध्द करण्याचा दिनांक 18 जुलै राहील. पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 25 जुलैपर्यंत, रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीतील गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 27 जुलै आहे. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे 5 ऑगस्टपर्यंत सुरु राहील. पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे 10 ऑगस्टपर्यंत राहील.
दहावी अकरावीनंतर:-
दहावी व अकरावी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ( व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून)ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी 30 जुलै पर्यंत आहे. पहिली निवड यादी अंतिम करणे व प्रसिध्द करण्याचा दिनांक 5 ऑगस्ट राहील. पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 14 ऑगस्टपर्यंत आहे. रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीतील गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 17 ऑगस्ट आहे. तर दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे 27ऑगस्टपर्यंत सुरु राहील. पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे 31 ऑगस्ट 2022पर्यंत पूर्ण होईल.
पदवी व पदव्युत्तरसाठी:-
बी.ए, बी.कॉम व बी.एस.सी. अशा बारावी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका व पदवी आणि एम.ए.एम.कॉम व एम.एस.सी असे पदवी नंतरचे पदव्युत्तर, पदवी, पदविकास आदी अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी 24ऑगस्टपर्यंत आहे. पहिली निवड यादी अंतिम करणे व प्रसिध्द करण्याचा दिनांक 10 सप्टेंबर आहे. पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 13 सप्टेंबरपर्यंत राहील. यानंतर रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीमधील गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 23 सप्टेंबर आहे. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे 28 सप्टेंबरपर्यंत सुरु राहील. पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे 31 सप्टेंबर 2022पर्यंत पूर्ण होईल.
व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी:-
व्यावसायिक अभ्यासक्रम ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी 30 सप्टेंबर 2022पर्यंत आहे. पहिली निवड यादी अंतिम करणे व प्रसिध्द करण्याचा दिनांक 3 ऑक्टोबर पर्यंत राहील. पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 13 ऑक्टोरपर्यंत आहे. रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीमधील गुणवत्तेनूसार निवड यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 15 ऑक्टोबर आहे. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे 25 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहील. पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे 28 ऑक्टोबर 2022 पर्यंत सुरु राहील. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, नागपूर या कार्यालयाशी संपर्क साधावा