VNI:-
गोंडवाना विद्यापीठाच्या परिसरात २१ जूनला योग दिनाचे आयोजन
गडचिरोली : आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी २१ जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे आणि योग देखील व्यक्तीला दीर्घ करते. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य गोंडवाना विद्यापीठाच्या परिसरात क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग ,गोंडवाना विद्यापीठ, जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय गडचिरोली,रोटरी क्लब, शिक्षणधिकारी (माध्यमिक), गडचिरोली, सी.आर.पी.एफ गडचिरोली, गुरुदेव सेवा मंडळ, आधारविश्व फाऊंडेशन, लॉयन्स क्लब, पतंजली योग परिवार, आर्ट ऑफ लिविंग ,पणती स्वयंसेवी संस्था गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जागतीक योग दिनाचे आयोजन २१ जून रोजी सकाळी ६.३० वाजता करण्यात येणार आहे. .
या प्रसंगी अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, उद्घघाटक म्हणून जिल्हाधिकारी संजय मीणा, प्रमुख अतीथी म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल झेड चिताडे, उपस्थित राहणार आहेत.
त्यामुळे २१ जून रोजी, विद्यापीठ परिसरात आयोजित जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. अनिल झेड यांनी केले आहे.
नागरिकांच्या सोयी साठी इंदिरा गांधी चौकापासून ते गोंडवाना विद्यापीठा पर्यंत वाहनांची निशुल्क सोय करण्यात आली आहे.तरी सर्वांनी या योग कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि नियमित योग करावा असे आवाहन करण्यात येत आहे.