VNI:-
MPSC Recruitment 2022 : एमपीएससीत गट 'क' पदांसाठी 228 जागांवर भरती
- एमपीएससीत मोठी भरती, सरकारी नोकरीचे तरूणांचे स्वप्न पुर्ण होणार
विदर्भ न्यूज इंडिया
मुंबई : तुम्ही जर सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असाल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे.एमपीएससीद्वारे गट क पदांसाठी 228 जागांवर भरती होणार आहे. त्यासाठी एमपीएससीकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे तरूणांनी या भरतीत त्वरीत अर्ज करावा.
एमपीएससीने गट क पदांसाठी 228 जागांवर भरती जाहीर केली आहे. राज्य सरकारच्या विविध विभागात गट क श्रेणीतील लिपीक ते अधिकारी पदांसाठी 228 जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी एमपीएससीने 228 जागांवर भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार 1 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
पद आणि जागा
उद्योग निरीक्षक गट क / उद्योग निरीक्षक गट क : 06 पदे
दुय्यम निरीक्षक गट क / से इन्स्पेक्टर ग्रुप सी : 09 पदे
कर सहायक, गट क / कर सहाय्यक, गट क : 114 पदे
लिपिक टंकलेखक गट क (मराठी ) / लिपिक टंकलेखक गट क : 89 पदे
लिपिक टंकलेखक गट क (इंग्रजी ) / लिपिक टंकलेखक गट क : 10 पदे
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी 394 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 294 शुल्क भरावा लागणार आहे, तर एक्सएसएमसाठी 44 रुपये शुल्क आहे.