एक असं रहस्यमयी ठिकाण, जिथे इंधनाशिवाय धावतात गाड्या; गुरुत्वाकर्षणाचा नियमही फेल - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

एक असं रहस्यमयी ठिकाण, जिथे इंधनाशिवाय धावतात गाड्या; गुरुत्वाकर्षणाचा नियमही फेल


Vidarbha News India:-
VNI:-
एक असं रहस्यमयी ठिकाण, जिथे इंधनाशिवाय धावतात गाड्या; गुरुत्वाकर्षणाचा नियमही फेल
- एक अशी गूढ टेकडी आहे, जिथे वाहने इंधनावर चालत नाहीत तर आपोआप चालतात. 
विदर्भ न्यूज इंडिया
आजच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती अनेकांना परवडत नाहीत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे जनतेच्या खिशावर अतिरिक्त बोजा पडतोय. पण तुम्हाला अशा ठिकाणाविषयी माहिती आहे का जिथे इंधनाशिवाय वाहनं आपोआप धावतात. होय, असं रहस्यमय ठिकाण फक्त भारतातच आहे. 
देशात एक अशी गूढ टेकडी आहे, जिथे वाहने इंधनावर चालत नाहीत तर आपोआप चालतात. या टेकडीच्या आजूबाजूला रात्रीच्या वेळी कोणी गाडी उभी ठेवली तर त्याला सकाळपर्यंत गाडी मिळत नाही. हे कसं घडतं, हे आतापर्यंत एक रहस्य आहे.
ताशी 20 किमी वेगाने कार धावते आम्ही ज्या गूढ टेकडीबद्दल बोलतोय ती लडाखच्या लेह भागातील आहे. ही टेकडी जादूपेक्षा कमी नाही. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, या टेकडीमध्ये चुंबकीय शक्ती आहे, जी ताशी 20 किलोमीटर वेगाने वाहने आपल्या दिशेने खेचते. म्हणूनच त्याला 'मॅग्नेटिक हिल' म्हणतात.
गुरुत्वाकर्षणाचा नियम अयशस्वी या चुंबकीय टेकडीला 'ग्रॅव्हिटी हिल' असंही म्हणतात. या टेकडीवर गुरुत्वाकर्षणाचा नियम बिघडतो असं मानलं जातं. गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार, एखादी वस्तू उतारावर सोडली तर ती खाली लोटते, परंतु या टेकडीवर असे होत नाही. इथे एखादी गाडी गिअरमध्ये टाकून सोडली तर गाडी खाली जाण्याऐवजी उतारावर चढते. इथे कोणताही द्रव जरी टाकला तरी तो खालच्या दिशेने न जाता वरच्या दिशेने वाहतो.
गुरुद्वारा पाथर साहिब जवळ असलेल्या टेकडीमध्ये अद्भुत चुंबकीय शक्ती असल्याचं वैज्ञानिकांचं मत आहे. आकाशात उडणारी विमानांवरही या टेकडीच्या चुंबकीय शक्तीचा परिणाम होतो. या टेकडीवरून उड्डाण केलेल्या अनेक वैमानिकांचा दावा आहे की येथे उड्डाण करताना विमानात अनेक हादरे जाणवतात.

Share News

copylock

Post Top Ad

-->