VNI:-
शिकाऊ विमान शेतात कोसळले, महिला वैमानिक जखमी
- बारामती येथून विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळात तांत्रिक बिघाड उद्भवला
विदर्भ न्यूज इंडिया
पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी येथे एक शिकाऊ विमान कोसळल्याची घटना आज(सोमवार) घडली. या दुर्घटनेत वैमानिक भावना राठोड या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात महिला वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते. आज सकाळी नेहमीप्रमाणे बारामती येथून विमानाने उड्डाण घेतले. मात्र त्यानंतर हे विमान इंदापूर येथील कडबनवाडी परिसरात आल्यावर त्यामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड उद्भवला आणि काही समजण्याच्या आतच विमान परिसरातील एका शेतात कोसळले.
विमान कोसळल्याचे दिसताच त्या शेतामध्ये असलेल्या नागरिकांनी महिला वैमानिक भावना राठोड यांना बाहेर काढले आणि उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले व पुढील तपास सुरू आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी येथे एक शिकाऊ विमान कोसळल्याची घटना आज(सोमवार) घडली. या दुर्घटनेत वैमानिक भावना राठोड या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. #Pune@MediaVNI pic.twitter.com/h5RaBvw2D2
— Vidarbha News India (@MediaVNI) July 25, 2022