मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे महापुरुषांची प्रतिमा खाली पडली - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे महापुरुषांची प्रतिमा खाली पडली

Vidarbha News India:-
VNI:-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे  महापुरुषांची प्रतिमा खाली पडली
विदर्भ न्युज इंडिया
मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप घडला. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे अचानक नॉट रिचेबल झाले.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे काही आमदारही असल्याचं बोललं गेले. त्यानंतर राजकीय सत्तानाट्यात शिंदे यांची बंडखोरी समोर आली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल ४० आमदार गेल्यानंतर राज्यातील मविआ सरकार अल्पमतात आले आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावं लागलं.
राज्यातील या घडामोडीत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे यांना भाजपानं ताकद दिली. शिंदे गट आणि भाजपा यांचे सरकार राज्यात स्थापन झाले. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून शक्तिप्रदर्शन करत विविध मेळावे आयोजित करत आहेत. शिंदे गटातील आमदार कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित करत आहेत. यात मध्यरात्री उशिरापर्यंत हे मेळावे चालतात. रविवारी जळगावच्या पाचोरा येथील भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते.
या मेळाव्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. परंतु मेळावा संपल्यानंतर काही अतिउत्साही कार्यकर्ते व्यासपीठावर पोहचले. त्याठिकाणी मोठी गर्दी झाल्याने काहीसा गोंधळ झाला. त्यातच गर्दीमुळे व्यासपीठावर असणाऱ्या महापुरुषांची प्रतिमा खाली पडली. ही घटना कार्यकर्त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेक शिवप्रेमी संताप व्यक्त करत आहेत.
या घटनेचा व्हिडिओ राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. मिटकरी यांनी म्हटलं आहे की, राजकारण करा पण महापुरुषांचा असा अनादर होत असेल तर ते जनता सहन करु शकणार नाही असं त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्या गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात शिंदे गटातील आमदार कार्यकर्त्यांना मुंबईत घेऊन येत शक्तिप्रदर्शन करत आहेत. एकीकडे राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने विरोधक सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत आहेत तर दुसरीकडे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू असल्याचं दिसून येत आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->