VNI:-
आमदार डॉ. देवराव होळी यांची चामोर्शी तालुक्यातील पूरग्रस्त भागास भेट
तातडीने सर्वेक्षण करून जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिक व शेतकरी यांना आर्थिक मदत करा...
- आमदार डॉ. देवराव होळी
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली: गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांनी चामोर्शी तालुक्यातील घारगाव येथील व परिसरतील पूरग्रस्त भाग येथे भेट देऊन भागातील शेतकरी शेतमजूर यांच्याशी संवाद साधला जिल्ह्यात सततच्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे अतिवृष्टी मुळे जिल्ह्यातील अनेक नागरिकांच्या घराची पडझड झाली आहे , घरात पाणी शिरून प्रचंड नुकसान झाले आहे.
अनेक शेतकऱ्यांचे पऱ्हे व रोवणी केलेले धान वाहून गेले त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे, यामुळे जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर हवालदिल झाले आहेत. यावेळी उपस्थित आमदार डॉ देवराव होळी यांनी भ्रमणध्वनी वर मंत्रालय मुंबई व जिल्हाधिकारी महोदय यांच्यासोबत चर्चा केली व विविध पूरग्रस्त भागातील शेतकरी शेतमजूर व नागरिकांच्या नुकसानी बाबत माहिती दिली व आढावा घेतला यावेळी आमदार डॉ देवराव होळी यांनी तातडीने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना शासनाच्या वतीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. यावेळी प्रामुख्याने भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे ,भाजप युवा नेते भोजराज भगत ज्येष्ठ नेते सेवक बोरकुटे ,मारोती भगत , यशवंत भगत , भगिंद्र झाडे , अशोक आभारे , जानकीराम आभरे , प्रकाश बोरकुटे व शेतकरी शेतमजूर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.