VNI:-
आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या निवासस्थानी देशाचा ७५ वा स्वतंत्र दिवस साजरा...
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील लोकप्रिय आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या चामोर्शी येथील निवासस्थानी आज ७५ वा स्वतंत्र दिवस साजरा करण्यात आला, असून यावेळी उपस्थित नागरिकांना देशाच्या तिरंगा विषयी त्यांनी माहिती दिली.
व हर घर तिरंगा मध्ये नागरिकांनी आपल्या घरी लावलेल्या तिरंगा झेंडा आज सायंकाळी काढून सुखरूप आपल्या घरी ठेवावा व तिरंग्याचा आपल्या घरी पडदा म्हणून किव्हा बसण्या करिता व इतर कोणत्याही कामा करिता उपयोग करू नये, असे म्हणाले व सर्वांनी आपल्या देशाचा तिरंगा झेंडा आपल्या घरी सुरक्षित ठेवा असे संबोधित सर्व देश वासीयांना ७५ वा स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या, या वेळी भारतीय जनता पार्टीचे बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष श्री सुरेश शाहा, माननीय दिलीप जी चलाख तालुका अध्यक्ष भाजपा, जयरामजी चलाख तालुका उपाध्यक्ष,श्री साईनाथ जी बुरांडे तालुका महामंत्री,श्री निराजी रामानुजनवार युवा मोर्चा उपाध्यक्ष,रामचंद्र वरवडे तालुका महामंत्री भाजप युवा मोर्चा,नगरसेवक विजय गेडाम,राकेश भैसारे, सुनील सोरते दिलीप जी नैताम अनिल सिंगलवार इत्यादी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.