चामोर्शी परिसरातील युवकांना क्रीडांगण व येथे नवीन बस स्थानक उपलब्ध करून देणार; खा.अशोकजी नेते. - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

चामोर्शी परिसरातील युवकांना क्रीडांगण व येथे नवीन बस स्थानक उपलब्ध करून देणार; खा.अशोकजी नेते.

Vidarbha News India :-
VNI:-
चामोर्शी परिसरातील युवकांना क्रीडांगण व येथे नवीन बस स्थानक उपलब्ध करून देणार; खा.अशोकजी नेते
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : चामोर्शी येथील परिसरात युवकांना क्रीडांगण उपलब्ध करून देण्यासाठी उपविभागीय अधिकारी तोडसाम साहेब यांची प्रत्यक्ष युवकांसोबत बैठक घेऊन या आठ दिवसांमध्ये क्रीडांगण उपलब्ध करून देण्यात यावा असा निर्देश खा.अशोकजी नेते यांनी दिले. वाढत्या वसाहतीमुळे चामोर्शी येथील छोटे- मोठे ग्राऊंड लुप्त होत चालले आहेत, त्यामुळे येथील युवा वर्ग नगरपंचायत आठवडी बाजाराच्या जागेवर क्रिकेट खेळतात, परंतु नगरपंचायतेतील कर्मचारी या खेळणाऱ्या मुलास त्या जागेवर खेळण्यास मनाई करतात. आणि काही युवा वर्ग पोलीस भरतीच्या तयारी करिता आष्टी रोड, घोट रोड, गडचिरोली रोडला धावायला व व्यायाम करायला जात असतात. पण या सर्व रोडला मोठ्या प्रमाणात गाड्यांची रहदारी चालू असल्याने छोटे मोठे अपघात होत असतात,असा अपघात मागील कोरोना काळात झाला आहे, स्थानिक मुलांना क्रीडांगणाच्या अभावी दुसऱ्या शहरात जाऊन पोलिस भरतीची तयारी करावी लागते, त्यामुळे युवकांना क्रीडांगण हि एक दैनंदिन जीवनातील एक मुलभूत गरज आहे. परंतु तालुक्याच्या ठिकाणी क्रीडांगण नसने हि खूप मोठी शोकांतिका आहे.त्याकरीता चामोर्शी शहरात क्रीडांगणास जागा उपलब्ध झाली आहे परंतु येथे उपलब्ध क्रीडांगण करिता उपलब्ध झालेल्या साडे सात एकर जागेची काय झाले या बद्दल प्रश्न निर्माण झाला व तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध क्रीडांगण येथे साफसफाई करून येथील अतिक्रमण हटवून येथील क्रीडांगणाची जागा प्रशासनाने येथील खेळाडू युवकांच्या मार्गदर्शनात कार्य करावे असे आदेश खासदार अशोक भाऊ नेते यांनी दिले. याकरिता स्थानिक युवकांनी या क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांना हि बाब सांगितल्यावर उपविभागीय अधिकारी यांची बैठक घेऊन या आठ दिवसात युवकांना क्रीडांगण उपलब्ध करून द्या असे आदेश खा.अशोकजी नेते यांनी दिले. यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश सदस्य स्वप्नील वरघंटे यांनी येथील प्रलंबित स्थानकाच्या विषय मांडला व खासदार अशोक भाऊ नेते यांनी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे या विषयावर बैठक लावण्याचे आश्वासन दिले, या प्रसंगी खा.अशोकजी नेते. प्रकाशजी गेडाम प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चा,रमेशजी बारसागडे किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष,स्वप्निल वरघंटे प्रदेश सदस्य,प्रकाशजी अर्जुनवार सामाजिक कार्यकर्ते,भास्करजी  बुरे सरपंच व ओबिसी मोर्चाचे सरचिटणीस उपविभागीय अधिकारी तोडासे साहेब,थानेदार शेवाळे साहेब तथा अधिकारी,कार्यकर्ते व अनेक युवकवर्ग उपस्थित होते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share News

copylock

Post Top Ad

-->