तुम्हाला स्वातंत्र्य दिनाविषयी किती माहितीये? द्या या प्रश्नांची उत्तरं... - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

तुम्हाला स्वातंत्र्य दिनाविषयी किती माहितीये? द्या या प्रश्नांची उत्तरं...

Vidarbha News India:-
VNI:-
तुम्हाला स्वातंत्र्य दिनाविषयी किती माहितीये? द्या या प्रश्नांची उत्तरं...
- आज आम्ही तुम्हाला स्वातंत्र्यदिनाबद्दल काही रोचक तथ्य सांगणार आहोत.
विदर्भ न्यूज इंडिया 
देशात आज 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. प्रत्येक भारतीयांसाठी आजचा दिवस अभिमानाचा आहे. देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा (75 Independence Day) आनंद साजरा करत आहेत. हर घर तिरंगा ( Har Ghar Tiranga) हे अभियान देशात मोठ्या उत्साहात राबवलं जातं आहे. 
खूप संघर्षानंतर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे. आपल्या देशाच्या शूरविरांच्या कथा आपण ऐकल्या आहेत. पण नवीन पिढीलाही याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला स्वातंत्र्यदिनाबद्दल काही रोचक तथ्य सांगणार आहोत. बघूयात या बद्दल तुम्हालाही किती माहिती आहे ते.
◆प्रश्न - 15 ऑगस्ट 1947 च्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात महात्मा गांधी सहभागी झाले होते का?
★उत्तर - नाही, महात्मा गांधी या सोहळ्याला उपस्थित नव्हते. 
◆प्रश्न - देश स्वातंत्र्य झाल्यानंतर भारतात किती संस्थाने सहभागी झाले होते?
★उत्तर - 560 संस्थाने
◆प्रश्न - भारताशिवाय अजून कुठला देश स्वातंत्रदिन साजरा करतो?
★उत्तर - कोरिया, कांगो, बहरीन आणि लिकटेंस्टीन 
◆प्रश्न - जवाहरलाल नेहरु यांना पंतप्रधानपदाची शपथ कोणी दिली होती?
★उत्तर -  लॉर्ड माउंटबेटन
◆प्रश्न - जवाहरलाल नेहरु यांनी 'ट्रिस्ट विद डेस्टनी' हे भाषण कुठे आणि केव्हा दिलं होतं?
★उत्तर - वायसराय लॉज म्हणजे आजचं राष्टपतीभवनमध्ये 14 ऑगस्टला मध्यरात्री हे भाषण केलं होतं. 
◆प्रश्न - 15 ऑगस्टला कोणत्या स्वातंत्र्यसैनिकाचा जन्म झाला होता?
★उत्तर -  महर्षि अरबिंदो घोष यांचा जन्म झाला होता. 
◆प्रश्न - स्वातंत्र भारताचे पहिले गर्वनर जनरल कोण होते?
★उत्तर - लॉर्ड माउंटबेटन
◆प्रश्न - गोवा हा भारताचा भाग कधी झाला?
उत्तर - 1961
◆प्रश्न - 'जन गण मन' हे भारताचं राष्ट्रगीत कधी बनलं?
★उत्तर - 24 जानेवारी 1950
◆प्रश्न - भारत आणि पाकिस्तानमधील सीमा कधी आखल्या गेली?
★उत्तर - 15  ऑगस्ट 1947

Share News

copylock

Post Top Ad

-->