Monsoon : पुढील काही दिवस महाराष्ट्राला मान्सूनच्या रौद्र रुपाचा तडाखा!.. - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

Monsoon : पुढील काही दिवस महाराष्ट्राला मान्सूनच्या रौद्र रुपाचा तडाखा!..

Vidarbha News India:-
VNI:-
Monsoon : पुढील काही दिवस महाराष्ट्राला मान्सूनच्या रौद्र रुपाचा तडाखा!..
- काही ठिकाणी पुरजन्य परिस्थितीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे
विदर्भ न्यूज इंडिया
Monsoon : IMD नं महाराष्ट्रासाठी पुढील 5 दिवसांच्या तीव्र हवामानाचा इशारा दिला आहे. ज्यामुळं कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मान्सूनच्या जोरदार (vigorous) सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (IMD Rain Monsoon alert Maharashtra Konkan Mumbai)
 हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी पुरजन्य परिस्थितीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 
कोणत्या भागात कोसळधार?
येत्या काही दिवसांमघध्ये पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरीत रेड अलर्ट सांगण्यात आला आहे. तर, घाटमाथ्यावर अतिवृष्टीची दाट शक्यता. कोकणात ऑरेंज अलर्ट, तर मराठवाडा आणि विदर्भासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. 
दरम्यान, रविवारपासून बरसणार्या पावसामुळं अनेक भागात दैनंदिन व्यवहारांवर परिणाम दिसून आले आहेत. रत्नागिरीतील रघुवीर घाटात दरड कोसळली. जवळपास 15 दिवसांतली ही तिसरी घटना. सदर घटनेमुळं सातारा जिल्ह्यातील 20 गावांचा रत्नागिरीशी संपर्क तुटला. 
रत्नागिरी जिल्ह्यासह चिपळूण शहरातही सतत कोसळत असलेल्या पावसामुळे शहरातील रस्ते जलयम झाले आहेत. चिपळूण परिसरातील गटारं तुंबल्यानं मार्कंडी, बाजारपेठमध्ये पाणी तुंबलं आहे. तर, वशिष्टी नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
 धरणं ओव्हरफ्लो 
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातलं निर्गुणा धरण ओव्हरफ्लो झालं आहे. त्यामुळे चारही बाजूंनी हिरव्यागार झाडांनी वेढलेलं धरण अत्यंत मोहक दिसतंय. सध्या धरणाच्या दोन्ही सांडव्यांमधून अर्ध्या फुटाने पाण्याचा विसर्ग सुरुये. धरण भरल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदचं वातावरण आहे. 

Share News

copylock

Post Top Ad

-->