यंदा गणेश चतुर्थीला जुळून येतोय हा दुर्मिळ योग, जाणून घ्या पूजेचा योग्य मुहूर्त... - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

यंदा गणेश चतुर्थीला जुळून येतोय हा दुर्मिळ योग, जाणून घ्या पूजेचा योग्य मुहूर्त...

Vidarbha News India:-
VNI:-
यंदा गणेश चतुर्थीला जुळून येतोय हा दुर्मिळ योग, जाणून घ्या पूजेचा योग्य मुहूर्त
विदर्भ न्यूज इंडिया
यंदाच्या गणेशेत्सवात एक दुर्मिळ योग जुळून येतोय, हा योग बाप्पाच्या जन्माच्या वेळी तयार झालेल्या योगांसारखाच असल्याचं जाणकार सांगतात.
यंदा गणेश चतुर्थी 31 ऑगस्ट रोजी येतेय. गणेश चतुर्थीला विनायक चतुर्थीही (Vinayak Chturthi)  बोललं जातं. या दिवशी अनेकांकडे गणपती बाप्पांची मूर्ती बसवली जाते आणि अकरा दिवस बाप्पाची विधिवत पूजा केली जाते. 
हिंदू सणांपैकी (Hindu festival)  अत्यंत महत्त्वाचा एक सण म्हणजे गणेश चतुर्थी. खरंतर कोरोनाच्या दोन वर्षांनंतर कोणत्याही निर्बंधांशिवाय गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav)  खास आहेच. मात्र, यंदाचा गणेशोत्सव आणखी एका कारणामुळे खास असणार आहे तो म्हणजे यंदाच्या तिथीमुळे. 
यंदाच्या गणेशेत्सवात एक दुर्मिळ योग जुळून येतोय, हा योग बाप्पाच्या जन्माच्या वेळी तयार झालेल्या योगांसारखाच असल्याचं जाणकार सांगतात. ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झालेला तेंव्हा भाद्रपद शुक्ल चतुर्थीला बुधवार होता. यंदाही भाद्रपद शुक्ल चतुर्थीला बुधवारचं येतो आहे.  
सोबतच, यंदा 31 ऑगस्टरोजीच उदीया कालिन आणि मध्यान्ह व्यापिनी चतुर्थी असल्याने बाप्पाच्या आगमनाचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यंदा दहा वर्षांपूर्वीच्या गणेश चतुर्थीला जसा रवी योग आलेला तो ही जुळून येतो. 
गणेश पूजेचा योग्य मुहूर्त कोणता? (Ganesh Puja Shubh Muhurt)
सकाळी 7 वाजून 05 मिनिटं ते 8 वाजून 40 मिनिटांपर्यंत गणेश पूजेचा अमृत योग (Amrut Yog) आहे 
पूजेत या गोष्टींचा करा समावेश
गणेश पूजेत गणपती बाप्पाला आवडणाऱ्या या गोष्टींचा वापर केल्याने लाभ मिळतो असं पुजारी सांगतात. यावेळी बाप्पाला दुर्वा, जास्वदांचं फूल, हळद, नारळ, मोदक, सुपारी, झेंडूचे फूल, केळी इत्यादी अर्पण बाप्पा प्रसन्न होतो असं म्हणतात. यासोबतच घरात सुख-समृद्धी वाढते, जीवनातील अडचणी संपतातअसं म्हणतात. 
after 10 years this rare ganesh chaturthi yog is coming know shubha muhurt for ganesh puja

Share News

copylock

Post Top Ad

-->