नशेत गाडी चालवताना फोन आला आणि; कार-दुचाकीच्या अपघातात 4 जणांचा मृत्यू... - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

नशेत गाडी चालवताना फोन आला आणि; कार-दुचाकीच्या अपघातात 4 जणांचा मृत्यू...

Vidarbha News India:-
VNI:-
नशेत गाडी चालवताना फोन आला आणि; कार-दुचाकीच्या अपघातात 4 जणांचा मृत्यू
 
- कार-दुचाकीच्या अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. भरधाव कारची 3 दुचाकींना उड्डाणपुलावर धडक बसली. या अपघातानंतर दुचाकीवरील चौघेही 80 फूट उंचीवरुन खाली फेकले गेले. यात चार जणांचा मृत्यू झाला. 
विदर्भ न्यूज इंडिया
नागपूर : कार-दुचाकीच्या अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. भरधाव कारची 3 दुचाकींना उड्डाणपुलावर धडक बसली. या अपघातानंतर दुचाकीवरील चौघेही 80 फूट उंचीवरुन खाली फेकले गेले. यात चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. नागपुरात कार चालकानं दारुच्या नशेत बेदरकारपणे कार चालवत तीन दुचाकीवरील 8 जणांना चिरडले. या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झालाय तर चार जण गंभीर जखमी झालेत. हा अपघात सक्करदरा परिसरातील उड्डाणपुलावर घडला. 
कारच्या भीषण धडकेनं दुचाकीवरील चौघे उड्डाणपुलाच्या 80 फूट उंचीवरून खाली फेकले गेले. या अपघातात चौघांचीही मृत्यू झालाय. मृतांमध्ये एक पुरुष, एक महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे. या अपघातातील मृतांत विनोद खापेकर( 40), लक्ष्मी खापेकर(65),विवान खापेकर( 4 ), वेदांत खापेकर (8) यांचा समावेश आहे.
- दारूच्या नशेत गाडी चालवताना त्याला फोन आला आणि ...
कार चालकाची दारुच्या नशेत फोन उचलण्याची गंभीर चुकी नागपुरात चार जणांच्या जीवावर बेतली आहे. नागपुरातल्या सक्करदरा उड्डाणपुलावर काल रात्री या अनियंत्रित कारने तीन दुचाकीना उडविले होते. उड्डाणपुलावर डिव्हायडर पलीकडे जाऊन कार गेली आणि तिने इतकी भीषण धडक दुचाकींना दिली होती की यापैकी दुचाकीवरील चार जण उड्डाणपलावरून खाली फेकले गेले. यामध्ये एकाच कुटुंबातील वडील, दोन चिमुरडे आणि आजीचा उड्डाणपुलावरून खाली पडून मृत्यू झाला. तर चार जण या गंभीर जखमी झाले आहे.
अनंत चतुर्दशीला रात्री सव्वा दहावाजताच्या सुमरास विनोद खापेकर, आई लक्ष्मी खापेकर विदांत, विवान खापेकर हा आपल्या दोन चिमकल्यासह सुमारास सक्करदरा उड्डाणपुलावरून टीमकीच्या दुचाकीने दिशेने जात होते.अचानक त्यांना अनियंत्रित कारने गाडीने जबर धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की चौघे जण फ्लायओवरच्या खाली फेकले गेले. सुमारे 70 ते 80 फूट उंचीवरून खालच्या रस्त्यावर फेकले गेल्याने चौघेही गंभीर जखमी झाले. त्यांना शासकीय वैदकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. 
दरम्यान, गाडी चालकाने अजून दोन दुचाकीना धडक दिली.यामध्येही चार जण जखमी झाले. सक्करदारा उड्डाणपुलावरील या भीषण अपघातामुळे एकच खळबळ उडाली. खापेकर कुटुंबातील दोन चिमुकल्यांसह चार जणांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते आहे
कार चालक गणेश कडवे याला अटक केली आहे. तो दारूच्या नशेत असल्याच पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघडकीस आला आहे. यावेळी सक्करदरा उड्डाणपुलावर गाडी नेत असताना त्याला फोन आला. त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं वेगाने अनियंत्रित गाडीने उड्डाण पुलावरील तीन दुचाकींना उडविले, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. अधिक तपास पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->