VNI:-
वाघाच्या हल्ल्यात बैल ठार ; व्याहाळ खुर्द वनक्षेत्रातील घटना
विदर्भ न्यूज इंडिया
तालुका प्रतिनिधी सावली:-
वन्य प्राणी वाचवण्यासाठी शासन त्याचप्रमाणे अधिकारी ज्यांचे युद्धपातळीवर कार्य सुरू असते पण प्राण्यांपासून मानव आणि गुरेढोरे यांच्यावर होत असलेल्या हल्ले थांबवण्यासाठी त्यांच्याकडून पाहिजे त्या प्रमाणात लक्ष दिले जात नाही. दिवसेंदिवस वाघाचे हल्ले वाढत असून मागील अनेक दिवसापासून सावली वनपरिक्षेत्रात मानवी जीवन व प्राणी यांच्यात संघर्ष सुरू असून तालुक्यातील घोडेवाही येथील विलास बाबुराव वाढणकार यांचा बैल जंगलात चरण्यासाठी गेला असता दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना काल व्याहाळ खुर्द वनक्षेत्रात किसाननगर शेतशिवारा लगत घडली.
सविस्तर वृत्त असे की काल दिनांक २२ सप्टेंबर रोजी वाढणकार यांचा बैल चरण्यासाठी गेला असता सायंकाळी घरी परत न आल्याने सर्वत्र शोधाशोध सुरू होती तेव्हां व्याहाळ खुर्द वनपरिक्षेत्रात किसाननगर शेतशिवारा लगत बैल मृतावस्थेत आढळून आला. सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. तेव्हा वनरक्षक मेश्राम मॅडम यांनी स्थळ पंचनामा करून वनविभागाला पाठविण्यात आला आहे. मागील वर्षी सदर पीडित व्यक्तीची म्हैस वाघाने फस्त केली होती. ही दुसरी घटना आहे. अशा घटना वारंवार होत असल्याने हिंस्त्र प्राण्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे. त्याचप्रमाणे संबंधित पिडीत व्यक्तीला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पीडिताने केली आहे.
सदर कारवाई उपक्षेत्र व्याहड खुर्द चे क्षेत्र सहाय्यक श्री ए एन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक कु एस के मेश्राम यांनी केली.