VNI:-
इंदिरा गांधी महाविद्यालय गडचिरोली येथे शिक्षक दिनानिमित्त; विद्यार्थी बनले प्राध्यापक व प्राचार्य
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : शिक्षक दिन कार्यक्रम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 5 सप्टेंबर रोज सोमवारला शिक्षक दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. या निमित्ताने शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थी, विद्यार्थीनी महाविद्यालय कार्यालयीन कामकाजा पासून तर शिक्षिकेच्या भूमिका पार पाडल्या. शिक्षक भूमिकेचे गुणदान दोन गटात करण्यात आले. त्यामध्ये इंदिरा गांधी कनिष्ठ तथा इंदिरा गांधी कला महाविद्यालय गडचिरोली. तर इंदिरा गांधी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयामधून प्रथम क्रमांक कु.अनामिका घनश्याम तिवाडे तर दितीय क्रमांक कु.जान्हवी नरेंद्र धाईत आणि महाविद्यालय स्तरांमध्ये प्रथम क्रमांक राजू देवेंद्र दामले व द्वितीय क्रमांक कु.साक्षी कान्हूजी जेंगठे या विद्यार्थ्यांनी पटकाविला.
या सर्व स्पर्धांचे पर्यवेक्षक म्हणून प्रा. अक्षय तिवाडे, प्रा. विशाल भांडेकर, प्रा. निलेश्वरी मस्के, प्रा. कु. हर्षाली मडावी यांनी केले.
तसेच मुख्याध्यापकाची भूमिका अश्विनी प्रेमानंद शेंडे तर चपराशीची भूमिका प्रितम दयाराम निमगडे यांनी चांगली कामगिरी केल्या बद्दल प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले.
या कार्यक्रमात मुख्य अतिथि म्हणून संस्थापक विश्व शांतिदूत प्रकाश आर अर्जुनवार होते. तसेच अतिथी म्हणून प्राचार्या नलिनी मेश्राम, प्रा. सुषमा भुरले, प्रा. दिपक ठाकरे, प्रा विशाल भांडेकर, प्रा. मनिषा येलमुलवार , प्रा. हर्षल गेडाम प्रमुख होते.
संचालन राजु दामले यांनी केले आणि आभार अखिल कुंभलकर यांनी केले.