VNI:-
जिल्हा परिषद शाळा बोळधा येथे केला उत्साहात शिक्षक दिन साजरा..
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : जिल्ह्यातील झाडीपट्टी अशी ख्याती असलेल्या देसाईगंज तालुक्यातील विसोरा केंद्रातील बोळढा शाळेत मोठ्या उत्साहाने ५ सप्टेंबर सोमवारला शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांची सुरवात डॉ. सर्वपली राधाकृषण, साने गुरुजी,महात्मा ज्योतीबा फुले सह सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यर्पण व द्विपप्रज्वलन करून सुरवात झाली. या प्रसंगी शाळेतील शिक्षक मा. प्रवीण यादव मुंजमकार, मा. एम. एस होळी सर मुख्याध्यापक यांचे मार्गदर्शन व नितीन परशुरमकर सर आणि उषा सिडाम मॅडम यांच्या कल्पकतेतून एक आगळा वेगळा स्वयंशासन कार्यक्रमही पार पडला. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे शाळा संचालित केली. काही विद्यार्थी शिक्षक होऊन अध्यापन कार्य केले. काही क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमांची जबाबदारी सांभाळली. शेवटी सहभोजन आणि सर्व विद्यार्थी शिक्षकांना खाऊ व भेटवस्तू देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.