सर्वजण जवळपास राहून आपापली गुरे चारत होते. दरम्यान दुपारी २ वाजता वाघाने एका भाकडी (वासरू) वर हल्ला केला तेव्हा सर्व गुराख्यांनी जनावरे एकत्र करण्याचा प्रयत्न केला, तरीही वाघाने भाकडीला ठार केले. त्यानंतर वाघाने गुराखी कृष्णा ढोणे यांच्यावर हल्ला करीत फरफटत नेले. याही वेळी इतर गुराख्यांनी आरडाओरड केली. परंतु वाघाच्या रौद्र रुपापुढे कुणाचेच काही चालले नाही. अखेर गावातील काही लोकांना बोलावून शोधमोहीम राबविली असता घटनास्थळापासून २०० मीटर अंतरावर कृष्णा ढोणे यांचा मृतदेह सापडला. घटनेची माहिती वनाधिकाऱ्यांना देताच त्यांनी पोहोचून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन व उत्तरीय तपासणीसाठी गडचिरोली येथे पाठविला.
VNI:-
वाघाने घेतला गुराख्याचा बळी; गावापासून १ मी दुर अंतरावरची घटना
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली: गावापासून अगदी एक किमी अंतरावरच्या जंगलात स्वतःची गुरे चारत असताना वाघाने हल्ला केल्याने एक शेतकरी गुराखी ठार झाला.