कंत्राटी कर्मचाऱ्यांची व्यथा...
साहेब, आम्ही आऊट्सोर्स असलो तरी...
आम्हालाही आहे मन..
त्यात आहेत भावना..
आणि आत्मसन्मानही...
फक्त आमच्या आतल्या
जरा माणसालाही बघा... I
आणि साहेब, जमलं तर थोडं
आमच्याशीही माणूसकीनं वागा... I
साहेब, आम्ही आऊटसोर्स असलो तरी
आमच्या फार नाहीत अपेक्षा
फक्त आमच्या कामाचीही
जरा जाण ठेवा...
तुटपुंज्या पगारातही आम्ही
राबराब राबताना
कुठे कमी पडतो सांगा ?
आणि साहेब जमलं तर थोडं..
आमच्याशीही माणूसकीनं वागा... I
साहेब आम्ही आऊटसोर्स असलो तरी
तुमच्या इतकंच करतो काम
तरिही मिळतो कमी दाम
आम्ही तरिही काम करु ..करतंच राहू
फक्त पदाच्या तोऱ्यात राहून
नका उगारु शब्दांचा बडगा
आणि साहेब,जमलं तर थोडं...
आमच्याशीही माणूसुकीनं वागा... I
आम्हीही शिकलो की हो
पण नाही मिळाली
शिक्षणाप्रमाणे नोकरी
पोटासाठी म्हणून आम्ही
तुमची पत्करली चाकरी
आम्हीही माणसंच आहोत
नका दाखावू प्रत्येकवेळी
आमची जागा
आणि साहेब जमलं तर थोडं
आमच्याशीही माणूसकीनं वागा.... I
वर्षा भिसे
एम. ए, बी.एड
( आऊटसोर्स - TRC )