अरण्यवास कोठरी बुद्ध विहार दिक्षा भुमीची प्रतिकृती व्हावी; माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांचे प्रतिपादन
- माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार यांनी ११ लाखांची देणगी केली जाहीर
यावेळी माजी मंत्री विहाराच्या विकासासाठी ११ लाखांची देणगी जाहीर केली. मार्गदर्शन करतांना माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार म्हणाले, आमच्या राजकीय कारकीर्दीस कमी वेळ मिळाला. अन्यथा मी बौद्ध विहार कोठरीचा कायापालट करून दिला असता. या बौद्ध विहारासाठी ११ लाख रुपये देणगी जाहीर करीत आहे. माझा शब्द म्हणजे शब्दच राहतो. मी पुन्हा पुन्हा येत राहीन अशी ग्वाही माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार यांनी दिली.
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील अरण्यवास बुद्ध विहार 'नाला संगम' कोठरी परिसर हे पर्यटन स्थळ असुन एक प्रकारचे नंदनवन आहे. पाच बोधी वृक्षाच्या झाडाखाली नालासंगमवर भन्ते भगीरथ दिक्षा भुमी सारखी प्रतिकृती करीत आहेत तेही शासनाच्या अनुदानावर नाही तर गोरगरीब, आदिवासी, बहुजनांच्या देणगी पैशातून याचा मला अभिमान वाटतो लाखो बौद्ध अनुयायीच नव्हेत. तर भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा आज मी अनुभवत आहे. कोठरी बुद्ध विहार दिक्षा भुमिची प्रतिकृती व्हावी असे प्रतिपादन पिरीपाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खा. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले.
चामोर्शी तालुक्यातील माडेमुधोली नजीकच्या अरण्यवास नाला संगम कोठरी परीसरातील बुद्ध विहारात दि. २७ गुरुवारला वर्षावास समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिरीपाचे जिल्हाध्यक्ष मुनिश्वर बोरकर होते. यावेळी माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार, माजी जिल्हा परीषद सदस्य अँड. राम मेश्राम "
माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, सामाजिक कार्यकर्ते ॲड. विनय बांबोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना माजी खा. प्रा. जोगेंद्र कवाडे पुढे म्हणाले, भगवान गौतम बुद्धांचे तत्वज्ञानच महान आहे. पंचशिलेचे पालन करून शांतीप्रिय बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी भंते भागीरथ आटोकाट प्रयत्न करीत आहेत. त्याच्या कार्याला आपण सर्वानी हातभार लावुया असेही प्रा. कवाडे म्हणाले.
"याप्रसंगी ॲड. राम मेश्राम अँड. विनय बांबोळे यांनी बौद्ध विहार कोठरी परिसराच्या विकासासाठी सर्वात परी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी म्हणाले की मी जागतिक दर्जाचे अनेक बौध्द स्थळ बघितले आहेत. म्हणून मला बौध्द विहार कोठरीचे आकर्षण वाटत आहे. कार्यकमाचे अध्यक्ष मुनिश्वर बोरकर यांनी भन्ते भगीरथ यांनी केलेल्या कामाची स्तृती करून सदर बुद्ध विहार पुर्णत्वास नेण्याकरीता सदैव सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन केले.
पुज्य भन्ते भगीरथ यांनी शासनाची कोणतीच मदत न घेता गोरगरीब, कष्टकरी लोकांच्या मदतीने बौद्धविहारच नव्हे तर विपश्यना केंद्र, मेडीटेशन सभागृहाची निर्मीती केलेली आहे. यात दर महिण्यात दहा दिवसाचे. धम्म साधना होणार आहेत असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचलन भोजराज कान्हेकर यांनी तर आभार प्रविण मुंजमकर यानी केले.
कार्यक्रमास माजी बिडीओ भडके, मारोती भैसारे, हसनभाई गिलानी, गोपाल रायपूरे, जि के. बारसींगे, घोट येथील पोरेड्डीवार, प्रमोद राऊत, मंगला मानकर, माला मेश्राम, जमनादास मेश्राम प्रविण मुजुमकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. विशेष"विदर्भ न्यूज इंडिया" चे मुख्य संपादक श्री. राजेश खोब्रागडे यांच्यासह, वी.एन.आय. मीडिया ग्रुप उपस्थित होता. कार्यक्रमास महाराष्ट्रसह , मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड या आजूबाजूच्या राज्यातील जवळपास लाखो संख्येने अनुयायी, जनसमुदाय उपस्थित होता.
- दरवर्षी भाऊबीज च्या दिवशी बुद्धविहारात बाहेरून आलेल्या भिकू संघाचे दैनंदिन पूजा वंदना, परीत्रण पाठ कार्यक्रमाचं आयोजन असते, वर्षवास समापन सोहळा हा दरवर्षी भाऊबीजच्या दुसऱ्या दिवशी असते, रात्री लोकांच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन नेहमीच असते यावेळी "मी योद्धा भीमा कोरेगावचा" या नाटकाचं आयोजन करण्यात आले होते.