तुम्हालाही ED ऑफिसर व्हायचेय? ईडीमध्ये कशी मिळते नोकरी अन् पात्रता काय असते? पाहा, डिटेल्स... - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

तुम्हालाही ED ऑफिसर व्हायचेय? ईडीमध्ये कशी मिळते नोकरी अन् पात्रता काय असते? पाहा, डिटेल्स...

Vidarbha News India:-
VNI:-
तुम्हालाही ED ऑफिसर व्हायचेय? ईडीमध्ये कशी मिळते नोकरी अन् पात्रता काय असते? पाहा, डिटेल्स...
विदर्भ न्यूज इंडिया
Job In ED: गेल्या अनेक महिन्यांपासून देशभरात सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीची (ED) जोरदार चर्चा आहे. देशभरातील अनेक ठिकाणी ईडीने छापेमारी करत कोट्यवधींची मालमत्ता जप्त केली आहे. याशिवाय अनेक राजकीय नेत्यांच्या मागेही ईडीचा ससेमिरा लागल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातही अनेक नेत्यांवर ईडीने कारवाईचा फास आवळला असून, आणखीही काही नेते ईडी रडावर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच ईडीचे कार्यालय, कार्यपद्धती, अधिकार, हक्क याविषयी देशवासीयांमध्ये प्रचंड कुतुहल असल्याचे पाहायला मिळतेय. ईडीमध्ये नोकरी करायची असल्यास नेमके काय करावे लागते, पात्रतेचे निकष काय असतात, जाणून घेऊया...
ईडी ही भारतातील एक अतिशय प्रभावी आणि शक्तिशाली संस्था म्हणून ओळखली जाते. केवळ देशातील नाही तर परदेशातील कोणत्याही मालमत्तेशी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे काम ईडी करते. ईडी अंतर्गत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची निवड IAS, IPS इत्यादी रँकच्या आधारे केली जाते.
ईडीमध्ये नोकरीसाठी काय करावे?

अंमलबजावणी संचालनायामध्ये ग्रुप A, B आणि C साठी अनेक पदांची भरती केली जाते. त्यापैकी काही पदांवर प्रतिनियुक्तीवर, तर काही पदांवर पदोन्नती व निवड प्रक्रियेच्या आधारे भरती केली जाते. ग्रुप ए पदांवर प्रतिनियुक्ती आधारावर भरती केली जाते. त्याअंतर्गत विशेष संचालक, अतिरिक्त संचालक, सहसंचालक, उपसंचालक, सहायक संचालक अशी पदे येतात. ग्रुप B च्या काही पदांवर पदोन्नतीने किंवा थेट भरती केली जाते. ग्रुप बी सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी पदासाठी निवड स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे केली जाते. दुसरीकडे, विविध भरती प्रक्रियेच्या आधारे ईडीद्वारे वेळोवेळी ग्रुप सी पदांची भरती केली जाते.
दरम्यान, ED मध्ये सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी बनण्यास इच्छुक असलेल्या तरुणांना स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत होणारी CGL परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. एसएससी सीजीएल परीक्षेत बसण्यासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते ३० दरम्यान असावी. तसेच काही विशेष पदांसाठी, कमाल वयोमर्यादा केवळ २७ वर्षे आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->