गडचिरोली : मौजा लड्डुडेरा (हेटळकसा) जंगलात नक्षलवाद्यांचे साहित्य मिळाले !Naxalites - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गडचिरोली : मौजा लड्डुडेरा (हेटळकसा) जंगलात नक्षलवाद्यांचे साहित्य मिळाले !Naxalites




Vidarbha News India:-

VNI:-

गडचिरोली : मौजा लड्डुडेरा (हेटळकसा) जंगलात नक्षलवाद्यांचे साहित्य मिळाले !Naxalites

विदर्भ न्यूज इंडिया

गडचिरोली : कुरखेडा भागातील मौजा लड्डुडेरा (हेटळकसा) जंगलाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दारूगोळा, स्फोटके आणि अन्य साहित्य असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर विशेष अभियान पथक गडचिरोली आणि बी.डी.डी.एस्. पथकाचे जवान यांनी कारवाई करून ते शोधून काढले आहे.

नक्षलवादी Naxalites शासनविरोधी विविध घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी गोपनियरित्या लपवून ठेवलेल स्फोटक साहित्य जप्त करण्यास गडचिरोली पोलिसांना यश आले आहे.

नक्षल्यांनी सदर साहित्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमिनीमध्ये पुरुन ठेवतात. अशा पुरुन ठेवलेल्या साहित्यांच्या वापर नक्षलवाद्यांकडुन नक्षल सप्ताह तसेच इतरप्रसंगी केला जातो. उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोमकें मालेवाडा हद्दीतील लड्डुडेरा (हेटळकसा) जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी पोलिस पथकांना नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात दारूगोळा, स्फोटके व इतर साहित्य पुरून ठेवले असल्याची गोपनिय माहिती मिळाली.

त्या माहितीच्या आधारे विशेष अभियान पथक गडचिरोली व बी. डी. डी. एस. पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना एका संशयीत ठिकाणी लपवुन ठेवलेले स्फोटके व इतर साहित्य शोधुन काढण्यात जवानांना यश आले आहे. यामध्ये 2 नग जिवंत कुकर, 2 नग क्लेमोर, 1 नग पिस्टल, 2 नग वायर बंडल व पाणी साठवण्याचा 1 नग जर्मन गंज इत्यादी नक्षल साहित्य हस्तगत करुन घटनास्थळावर Naxalites मिळालेल्या मुद्देमालावर कायदेशिर कारवाई करण्यात आली. यात स्फोटकांनी भरलेले 2 नग कुकर व 2 नग क्लेमोर हे बीडीडिएस पथकाच्या मदतीने अत्यंत सतर्कतेने जागेवरच नष्ट करण्यात आले असून, इतर साहीत्य गडचिरोली येथे आणण्यात आलेले आहे. गडचिरोली पोलिस दलाकडुन पुढील कारवाई सुरु आहे.

सदर कामगिरी पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. Naxalites अभियानात सहभागी असलेल्या विशेष अभियान पथक गडचिरोली व बी.डी.डी.एस. पथकाच्या जवानांचे पोलिस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे. नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याचे सांगत नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे



Share News

copylock

Post Top Ad

-->