T20 World Cup 2022 : आजपासून टी20 वर्ल्ड कपला सुरुवात; 16 संघाचा रणसंग्राम, कसं असेल सामन्यांचं शेड्यूल? - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

T20 World Cup 2022 : आजपासून टी20 वर्ल्ड कपला सुरुवात; 16 संघाचा रणसंग्राम, कसं असेल सामन्यांचं शेड्यूल?

Vidarbha News India:-

VNI- World:-

T20 World Cup 2022 : आजपासून टी20 वर्ल्ड कपला सुरुवात; 16 संघाचा रणसंग्राम, कसं असेल सामन्यांचं शेड्यूल?

T 20 World Cup 2022 Schedule : आजपासून आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेला (ICC T20 World Cup 2022) सुरुवात होत आहे.

विदर्भ न्यूज इंडिया

यंदा वर्ल्ड कप स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना आज श्रीलंका आणि नामिबिया यांच्यात रंगणार आहे. आजपासून पहिल्या फेरीला सुरुवात होणार असून या फेरीचा शेवटचा सामना 21 ऑक्टोबरला होईल. त्यानंतर 22 ऑक्टोबरपासून सुपर 12 ही दुसरी फेरी सुरु होईल. विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे. 23 ऑक्टोबरला भारत विरुद्ध पाकिस्तान अशी लढत पाहायला मिळणार आहे. यंदा विश्वचषक स्पर्धेत 16 संघामध्ये रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. टी 20 विश्वचषकातील अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये होणार आहे.

टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ (T20 World Cup Team India)

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह

राखीव खेळाडू : मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, शार्दूल ठाकूर

T20 विश्वचषक 2022 पूर्ण वेळापत्रक

* पहिली फेरी : क्वालीफाइंग राउंड

  • 16 ऑक्टोबर अ गट : श्रीलंका विरुद्ध नामिबिया, गिलॉन्ग 9:30 वाजता
  • 16 ऑक्टोबर अ गट : UAE विरुद्ध नेदरलँड्स, जिलॉन्ग दुपारी 1.30 वाजता
  • 17 ऑक्टोबर ब गट : वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलंड, होबार्ट रात्री 9.30 वाजता
  • 17 ऑक्टोबर ब गट : झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड, होबार्ट दुपारी 1.30 वाजता
  • 18 ऑक्टोबर अ गट : नामिबिया विरुद्ध नेदरलँड्स, जिलॉन्ग रात्री 9.30 वाजता
  • 18 ऑक्टोबर अ गट : श्रीलंका विरुद्ध यूएई, जिलॉन्ग दुपारी 1.30 वाजता
  • 19 ऑक्टोबर ब गट : स्कॉटलंड विरुद्ध आयर्लंड, होबार्ट रात्री 9.30 वाजता
  • 19 ऑक्टोबर ब गट : वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे, होबार्ट दुपारी 1:30 वाजता
  • 20 ऑक्टोबर अ गट : श्रीलंका विरुद्ध नेदरलँड्स, जिलॉन्ग रात्री 9.30 वाजता
  • 20 ऑक्टोबर अ गट : नामिबिया विरुद्ध यूएई, जिलॉन्ग दुपारी 1.30 वाजता
  • 21 ऑक्टोबर ब गट : वेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड, होबार्ट 9:30 वाजता
  • 21 ऑक्टोबर ब गट : स्कॉटलंड विरुद्ध झिम्बाब्वे, होबार्ट दुपारी 1.30 वाजता

* दुसरी फेरी : सुपर 12

  • 22 ऑक्टोबर न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सिडनी 12:30 वाजता
  • 22 ऑक्टोबर इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान, पर्थ 4:30 वाजता
  • 23 ऑक्टोबर A1 विरुद्ध B2, होबार्ट 9:30 वाजता
  • 23 ऑक्टोबर भारत विरुद्ध पाकिस्तान, मेलबर्न दुपारी 1.30 वाजता
  • 24 ऑक्टोबर बांगलादेश विरुद्ध A2, होबार्ट 12:30 वाजता
  • 24 ऑक्टोबर दक्षिण आफ्रिका विरुद्ध B1, होबार्ट 4:30 वाजता
  • 25 ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया विरुद्ध A1, पर्थ दुपारी 4:30 वाजता
  • 26 ऑक्टोबर इंग्लंड विरुद्ध B2, मेलबर्न रात्री 9.30 वाजता
  • 26 ऑक्टोबर न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान, मेलबर्न दुपारी 1.30 वाजता
  • 27 ऑक्टोबर दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश, सिडनी सकाळी 8.30 वाजता
  • 27 ऑक्टोबर भारत विरुद्ध A2, सिडनी 12:30 वाजता
  • 27 ऑक्टोबर पाकिस्तान विरुद्ध B1, पर्थ दुपारी 4.30 वाजता
  • 28 ऑक्टोबर अफगाणिस्तान विरुद्ध B2, मेलबर्न रात्री 9:30 वाजता
  • 28 ऑक्टोबर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मेलबर्न दुपारी 1.30 वाजता
  • 29 ऑक्टोबर न्यूझीलंड विरुद्ध A1, सिडनी दुपारी 1:30 वाजता
  • 30 ऑक्टोबर बांगलादेश विरुद्ध B1, ब्रिस्बेन सकाळी 8:30 वाजता
  • 30 ऑक्टोबर पाकिस्तान विरुद्ध A2, पर्थ 12:30 वाजता
  • 30 ऑक्टोबर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पर्थ दुपारी 4.30 वाजता
  • 31 ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया विरुद्ध B2, ब्रिस्बेन दुपारी 1:30 वाजता
  • 1 नोव्हेंबर अफगाणिस्तान विरुद्ध A1, ब्रिस्बेन रात्री 9:30 वाजता
  • 1 नोव्हेंबर इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, ब्रिस्बेन 1:30 वाजता
  • 2 नोव्हेंबर B1 विरुद्ध A2, अॅडलेड 9:30 वाजता
  • 2 नोव्हेंबर भारत विरुद्ध बांगलादेश, अॅडलेड दुपारी 1:30 वाजता
  • 3 नोव्हेंबर पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सिडनी दुपारी 1.30 वाजता
  • 4 नोव्हेंबर न्यूझीलंड विरुद्ध B2, अॅडलेड 9:30 वाजता
  • 4 नोव्हेंबर ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान, अॅडलेड दुपारी 1.30 वाजता
  • 5 नोव्हेंबर इंग्लंड विरुद्ध A1, सिडनी दुपारी 1:30 वाजता
  • 6 नोव्हेंबर दक्षिण आफ्रिका विरुद्ध A2, अॅडलेड सकाळी 5:30 वाजता
  • 6 नोव्हेंबर पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, अॅडलेड रात्री 9.30 वाजता
  • 6 नोव्हेंबर भारत विरुद्ध B1, मेलबर्न दुपारी 1:30 वाजता

आता थिएटरमध्ये पाहा T20 वर्ल्ड कप सामने

तुम्हाला टी20 वर्ल्ड कप मॅच (T20 World Cup) थिएटरमध्ये (Match Live) लाईव्ह पाहता येणार आहे. आयनॉक्स (INOX) मल्टीप्लेक्सने (Multiplex) आयसीसीसोबत करार केला आहे. यामुळे आयनॉक्स (INOX) थिएटरमध्ये तुम्हाला टी 20 वर्ल्ड कप सामने लाईव्ह पाहता येणार आहेत. वर्ल्ड कपमधील भारताचे सर्व सर्व सामने आयनॉक्स मल्टिप्लेक्समध्ये तुम्हाला लाईव्ह पाहता येतील. देशभरातील आयनॉक्स सिनेमागृहांमध्ये वर्ल्ड कपच्या सामन्यांचं लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात येईल.

Share News

copylock

Post Top Ad

-->