गोंडवाना विद्यापीठात आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन... - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गोंडवाना विद्यापीठात आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन...

Vidarbha News India - VNI
गोंडवाना विद्यापीठात आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन
उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांशी हस्तांदोलन करतांना कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : खेळ आपले शरीर निरोगी ठेवते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी खेळाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, त्यातूनच माणूस आत्मनिर्भर बनतो आणि जीवनात यश संपादन करत असतो. खेळ भावनेने खेळत राहावे. यश अपयश चालत राहते. त्यातून बोध घेऊन येणाऱ्या क्रीडा स्पर्धांसाठी सज्ज राहावे. क्रीडा विभागाला स्वयंपूर्ण होता यावे यासाठी या विभागाला आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा देण्यात येतील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आणि  स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
गोंडवाना विद्यापीठाच्या क्रीडांगणावर क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मंचावर बोलतांना विद्यापीठाचे प्र-कलगुरू डॉ. श्रीराम कावळे आणि संचालक क्रीडा आणि शारीरिक विभाग डॉ. अनिता लोखंडे उपस्थित होत्या.
प्रास्ताविक डॉ. अनिता  लोखंडे यांनी केले. संचालन ज्ञानेश्वर ठाकरे तर आभार राजू चावके यांनी मानले. या उदघाटना नतंर कब्बडी च्या सामन्याला सुरुवात झाली.
या स्पर्धांमध्ये गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयातील मुलांचा कब्बडी चा संघ सहभागी झाला होता. कबड्डीचे सामने आजपासून ते १९नोव्हेंबर पर्यंत चालणार आहेत. याचे संयोजन डॉ. राजेंद्र गोरे करित आहे.
त्यानंतर २१ नोव्हेंबर पासून ते २३ नोव्हेंबर पर्यंत व्हॉलीबॉल चे सामने होतील. या सामन्यांचे संयोजन आनंद वानखेडे करणार आहेत.
ॲथलेटिक्स चा मुला मुलींचे सामने 24 नोव्हेंबर पासून ते 26 नोव्हेंबर पर्यंत चालतील. या सामन्यांचे संयोजन डॉ. सत्येंद्रसिंग, डॉ. संजय मुरकुटे,  संगीता बांबोळे हे करतील.
स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना गोंडवाना विद्यापीठाचे ,प्र-कुलगुरू ,डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव  डॉ.अनिल हिरेखन यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. संचालक शारीरिक क्रीडा विभाग डॉ. अनिता लोखंडे यांच्या मार्गदर्शनात आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. या उद्घाटन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विक्की पेटकर, महेश जोशी सतीश पाटोळे, निलेश राठोड यांनी सहकार्य केले.

Share News

copylock

Post Top Ad

-->