"शेतकऱ्यांचा आसूड" वाचनाने महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरी
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली :
ता.प्रतिनिधी : देसाईगंज वडसा :-
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोडदा येथे दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने शाळेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यात क्रांतीबा ज्योतीबा फुले नी लिखाण केलेल्या "शेतकऱ्यांचा आसूड" या पुस्तकाचे क्रमशः वाचन करण्यात आले. विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगाबद्दल माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्ष माननीय होळी सर होते. तर प्रवीण यादव मुंजमकर सरांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा कणखरता जीवन प्रवास विद्यार्थ्यांना सांगितला. श्रीमती सीडाम मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सावित्रींचा त्याग व कार्य याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन परशुरामकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी श्रुतिका रामटेके हिने केले. एकंदरीत कार्यक्रम अतिशय हर्ष उल्लासाने पार पडला. असे विविधांगी उपक्रम कार्यक्रम राबवून आपल्या महापुरुषांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात येते.