आदिवासी हे वनवासी नाहीत, आदिवासीच देशाचे मूळ मालक - खा. राहुलजी गांधी - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

आदिवासी हे वनवासी नाहीत, आदिवासीच देशाचे मूळ मालक - खा. राहुलजी गांधी

Vidarbha News India - VNI
आदिवासी हे वनवासी नाहीत, आदिवासीच देशाचे मूळ मालक - खा. राहुलजी गांधी
विदर्भ न्यूज इंडिया
वाशीम : देशात सर्वप्रथ आदिवासींचे वास्तव्य होते. म्हणूनच आदिवासीच या देशाचे खरे मालक असून ते वनवासी नाहीत. असे प्रतिपादन खासदार राहुलजी गांधी यांनी केले. भारत जोडो यात्रे दरम्यान बोराळा हिसे फाटा वाशीम खासदार राहुल गांधी यांनी बिरसा मुंडा पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले.        
देशात वाढलेली महागाई, बेरोजगारी, ढासळलेली अर्थव्यवस्था, शेतकरी आत्महत्या, धार्मिक व जातीय विव्देष पसरत असल्याच्या कारणास्थव देशातील संविधानाने दिलेले दलित आदिवासी ओबीसींचे संविधानिक हक्क आबादित ठेवण्यासाठी व देशात जातीधर्मामध्ये एकमेकांबद्दल आदर निर्माण होऊन देशात सर्वधर्म संभव नांदण्यासाठी मा. खा. राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी पदयात्रा काढलेली आहे. 
हि पदयात्रा दि.७-नोव्हेंबर ते २० -नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रातुन चाललेली होती. यादरम्यान १५ नोव्हेंबर ला हि यात्रा वाशीम जिल्ह्यात येणार होती याचे औचित्य साधून अखिल भारतीय आदिवासी काँग्रेस तथा महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस ने १५ नोव्हेम्बर ला वीर बिरसा मुंडा जयंती साजरी करण्याचे ठरविले . त्यानुसार १५ नोव्हेंबर ला वाशीम हिंगोली महामार्ग बोराळा हिस्से फाटा गुरुद्वारा जवाड वाशीम येथे मोठ्या जल्लोषात वीर बिरसा मुंडा जयंती करण्यात आली. महाराष्ट्र राज्यसहित छत्तीसगड, तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, राज्यस्थान, गुजरात, कर्नाटक, या राज्यातिल एकूण २५ हजार ते ३० हजार लोक उपस्थित होते. या सभेत खासदार राहुलजी गांधी बोलताना म्हणाले कि, भाजप व RSS हे आदिवासींचे नैसर्गिक हक्क डावलण्यासाठी आदिवासींना वनवासी असे संबोधततात. आदिवासी हे वनवासी नसून या देशाचे मूळ निवासी आहे. बिरसा मुंडा हे फक्त आदिवासींसाठीच न लढत संपूर्ण देशातील जल, जंगल, जमीन वाचविण्यासाठी ब्रिटिशांशी लढा दिला. ते थोर स्वात्यंत्र सेनानी होते. आज RSS व भाजपा वीर बिरसामुंडा यांच्या विचारावर अतिक्रमण करून आदिवासींचे नैसर्गिक हक्क डावलत आहे. 
तसेच संविधानाच्या माध्यमातून दलित आदिवासी ओबीसींना मिळणारे घटनात्मक अधिकार सुद्धा डावलण्यात येत आहे. त्याकरिता देशातील घटना वाचविण्यासाठी व दलित आदिवासी ओबीसींचे घटनादत्त अधिकार वाचविण्यासाठी भारतातील संपूर्ण नागरिकांनी सहभागी होऊन खोटे आश्वसन देणाऱ्या व देशाची प्रतिमा मलिम देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला धडा शिकवा. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष अँड. शिवाजीराव मोघे यांनी केले. तर सूत्रसंचालन महराष्ट्र प्रदेश आदिवासी कोंकग्रेसचे अध्यक्ष डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी केले.. या कार्यक्रमासाठी  भारत जोडो यात्रेचे संयोजक जयराम रमेश, दलित आदिवासी ओबीसी राष्ट्रीय समन्वयक के.राजू, महासचिव तथा महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील. प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, विधिमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव आशिष दुआ, माजी मंत्री वसंत पुरके,  खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार अमित झनक, माजी मंत्री अनिश अहमद, आमदार डॉ वसाहत मिर्झा,आमदार शिरीष नाईक, आमदार सहसराम करोटे,जी.प. वाशीम उपाध्यक्ष चक्रधर गोटे, महासचिव छत्तीसगड छवींद्र कर्मा, नुलिका कर्मा , शंकरलाल बोडाख, हसनभाई गिलानी, मनोहर पोरटी, जितेंद्र मोघे,आदी  हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.

Share News

copylock

Post Top Ad

-->