संविधान वाचवण्यासाठी आदिवासी बांधवांनी जागृत राहावे - माजी आमदार तथा अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस डॉ. नामदेव उसेंडी - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

संविधान वाचवण्यासाठी आदिवासी बांधवांनी जागृत राहावे - माजी आमदार तथा अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस डॉ. नामदेव उसेंडी

Vidarbha News India - VNI
संविधान वाचवण्यासाठी आदिवासी बांधवांनी जागृत राहावे - माजी आमदार तथा अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस डॉ.नामदेव उसेंडी

विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : आदिवासी समाजातील पोटजातींनी आपआपसातील मतभेद बाजूला ठेवून समाजासमोर असलेल्या समस्यांना एकजुटीने सामना करावा. संविधान संपवण्याचे काम सध्या चालू आहे. परंतु बाबासाहेबानी दिलेले सविधानच देशाला वाचवू शकते. म्हणूनच संविधान वाचवण्यासाठी आदिवासी समाजाने जागृत राहावे असे प्रतिपादन माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा व माजी राज्यमंत्री कै. बाबुरावजी मडावी यांचा जयंतीच्या कार्यक्रमात  केले. 
कै. बाबूरवजी मडावी स्मारक समिती, तथा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लेइज फेडरेशन, आदिवासी हलबा - हलबी समाज संघटना/ महासंघ, नारी शक्ती संघटना, आदिवासी गोंड- गोवारी, (कोपा) संघटना, कस्ट्राईब कर्मचारी महासंघ, आदिवासी एकता युवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती तसेच गडचिरोली जलिहताचे शिल्पकार तथा माजी राज्यमंत्री कै. बाबुरावजी मडावी यांचा जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी आमदार डॉ देवराव होळी, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस डॉ नामदेवराव उसेंडी, प्रदेश महासचिव काँग्रेस कमिटी डॉ नामदेव किरसान, सिनेट सदस्य डॉ सतीश कंनाके, कै, बाबूराव मडावी स्मारक समिती अध्यक्ष गुलाबराव मडावी, माजी. सभापती जी.प. मीनाताई कोडापे, माजी नगरसेविका रंजना गेडाम,माजी नगरसेविका संध्याताई उईके, प्रकाश मडावी,  प्रकाश मडावी, माधवराव गावंड, सदानंद ताराम, शालीकराव मानकर, झनकलाल मंगर, कैलासजी मडावी, सुरेश किरंगे, अमरसिंग गेडाम, देवराव आलम, रुषी होळी, सुरज मडावी, विनायक कोडापे, रवींद्र गेडाम, नामदेव उसेंडी, जीवन गेडाम, ओमप्रकाश शिडाम आदी बहुसंख्येने समाजबांधव उपस्थित होते.

Share News

copylock

Post Top Ad

-->