गडचिरोली जिल्ह्यात क्वेस्टचा ‘पालवी’ हा कार्यक्रम सपन्न - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गडचिरोली जिल्ह्यात क्वेस्टचा ‘पालवी’ हा कार्यक्रम सपन्न

Vidarbha News India - VNI
गडचिरोली जिल्ह्यात क्वेस्टचा ‘पालवी’ हा कार्यक्रम सपन्न...
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात पालवी प्रकल्प मार्च २०२२ पासून सुरू झाला. प्रकल्पाच्या पहिल्या वर्षात धानोरा तालुक्यात १८ मॉडेल अंगणवाड्या तयार होतील. धानोरा येथे क्वेस्टतर्फे ६-स्तरीय कार्यक्रमाचे दोन ट्रेनिंग प्रोग्रॅम पूर्ण झाले आहेत. पुढच्या वर्षी या प्रशिक्षित अंगणवाडी सेविका त्यांच्या बीटमधील इतर सेविकांना ट्रेनिंग देतील. क्वेस्ट संस्थेची गडचिरोलीमधील टीम त्यांना बालशिक्षणाच्या कामात वेळोवेळी मदत करील.
अंगणवाडी सेविकांना tabचे वाटप 
नोव्हेंबर महिन्यात झालेल्या प्रशिक्षणाच्या वेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी मा. अर्चना इंगोले आणि बालविकास प्रकल्प अधिकारी आरमोरी, धानोरा मा. किर्तीकुमार कटरे, ICDS धानोरा सुपरवायझर हे उपस्थित होते. याचसोबत गडचिरोली पालवी टिमही यावेळी उपस्थित होती. त्यांच्या हस्ते अंगणवाडी सेविकांना tab टॅब देण्यात आले. या टॅब मध्ये क्वेस्टने तयार केलेले पालवी app अँप घालून दिले आहे. त्यामध्ये अंगणवाडी ताई वेगवेगळ्या पाठांचे डेमो पाहू शकतील, आणि अंगणवाडीतील प्रत्येक मुलाच्या प्रगतीची नोंदही करू शकतील.  
पालवी प्रकल्पात सहभागी झालेल्या सर्व अंगणवाडी सेविका खूप उत्साहाने सर्व बाबी शिकून घेत आहेत. प्रकल्प सुरू होऊन थोडेच दिवस झाले असले, तरी त्यांना मुलांमध्ये फरक दिसून येतो आहे. अबोल वाटणारी मुले आता चित्रचर्चा किंवा सहभागी वाचन अशा कृतींमध्ये सहभागी होऊ लागली आहेत. पालवी प्रकल्पाच्या कालावधीत मुलांना अक्षरे आणि संख्यांची ओळख होईल, मुले अभिनयगीत आणि सामूहिक खेळ शिकतील आणि त्यांना अंगणवाडीत येणं आवडू लागेल  असा सर्व अंगणवाडी ताईंना विश्वास वाटतो आहे.
क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट (क्वेस्ट) या सामाजिक संस्थेची स्थापना २००७ साली झाली. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी क्वेस्टचे विविध उपक्रम ग्रामीण आणि आदिवासी विभागात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासोबत चालवले जातात. गेल्या काही वर्षांत क्वेस्टच्या विविध प्रकल्पांद्वारा हे काम महाराष्ट्रातील ३ लाख मुलांपर्यंत आणि ११,००० शिक्षकांपर्यंत पोचलं आहे.

‘पालवी’ कार्यक्रमाविषयी 
क्वेस्टचा ‘पालवी’ हा कार्यक्रम अंगणवाडी हे बालशिक्षणाचे प्रभावी केंद्र बनावे यासाठी आहे. पालघर, परभणी, अमरावती अशा जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प यशस्वीपणे राबवल्यानंतर आता गडचिरोली ICDS डिपार्टमेंट आणि जिल्हा परिषद यांच्या सहकार्याने पालवी प्रकल्प सुरू झाला आहे. यासाठी आर्थिक साहाय्य MFE आणि INDIRA FOUNDATION या संस्थांनी दिलं आहे. क्वेस्टने अंगणवाडी सेविकांसाठी ६-स्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम आखला आहे. त्यात बालशिक्षणाचे विविध पैलू शिकवले जातात.

क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट (क्वेस्ट) या सामाजिक संस्थेची स्थापना २००७ साली झाली. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी क्वेस्टचे विविध उपक्रम ग्रामीण आणि आदिवासी विभागात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासोबत चालवले जातात. गेल्या काही वर्षांत क्वेस्टच्या विविध प्रकल्पांद्वारा हे काम महाराष्ट्रातील ३ लाख मुलांपर्यंत आणि ११,००० शिक्षकांपर्यंत पोचलं आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->