नवोदय मराठी प्राथमिक शाळा घोट येथे आभा कार्ड शिबिराचे आयोजन
ता. प्रतिनिधी चामोर्शी
पोलिस मदत केंद्र घोट च्या वतीने (दि.१४) ला नवोदय प्राथमिक शाळा घोट येथे शालेय विद्यार्थ्यांचे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट (आभा) कार्ड काढण्यात आले. केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत डिजिटल मिशन २०२२ योजने अंतर्गत देशातील सर्व नागरिकांची १४ अंकी हेल्थ आयडी काढण्यात येत आहे. सदर आयडी मध्ये व्यक्तीची आरोग्य विषयक खाजगी माहिती जसे की ब्लड ग्रुप, बिमारी, त्यांना चालू असलेल्या गोळ्या औषाद्या, रिपोर्ट इतर माहिती डिजिटल स्वरूपात गोळा करून ठेवण्यात येत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे ही माहिती आपल्या सहमती शिवाय इतर कोणीही पाहू शकत नाही. सदर कार्यक्रमाला पोलिस मदत केंद्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रोंडे साहेब, पोलिस निरीक्षक श्रीमंगल साहेब, पोलिस अमालदर शिवाजी शिंदे, राहुल पठारे, नवोदय स्कूल च्य मुख्याध्यापिका विजयश्री कांबळे मॅडम, गोवर्धन सर, ढोरे सर, भांडेकर बाबूजी तसेच इतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमा करीता डिजिटल कनेक्ट घोट चे संचालक गौतम उराडे व सहकारी यांच्या साहाय्याने ७० विद्यार्थ्यांचे कार्ड काढण्यात आले.