महाराष्ट्रात 70 हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता, सुमारे 55 हजार रोजगारनिर्मिती होण्याचा सरकारचा दावा
विदर्भ न्यूज इंडिया
मुबंई : राज्य सरकारने उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या आजच्या चौथ्या बैठकीत 70 हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. देशातील पहिला इलेक्ट्रिक व्हेईकल प्रकल्प पुण्यामध्ये होणार असून गडचिरोलीत 20 हजार कोटींच्या स्टील प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे.
या गुंतवणुकीमुळे सुमारे 55 हजार रोजगारनिर्मिती होईल असा सरकारचा दावा आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांची विशेष गरज लक्षात घेता त्या पद्धतीने औद्योगिक तंत्रज्ञान उद्यान विकसित करण्याची सूचना यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. विदर्भातील गडचिरोली व चंद्रपूरसारख्या नक्षलग्रस्त जिह्यांमध्ये तीन मोठे प्रकल्प उभारण्याकरिता उपसमितीने मान्यता दिलेली आहे. मंत्रालयात झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी उपस्थित होते.
दहा हजार कोटींची गुंतवणूक असलेला महिंद्रा इलेक्ट्रिक व्हेईकल ऑटोमोबाईल्सचा देशातील पहिला प्रकल्प पुणे येथे सुरू होणार आहे.
गडचिरोली जिह्यात मे. लॉयड मेटल्स एनर्जी लि. या घटकाचे खनिज उत्खनन व प्रक्रिया याद्वारे 20 हजार कोटींचा स्टीलनिर्मितीचा प्रकल्प
गडचिरोली जिह्यात मे. वरद फेरो अलॉय कंपनीच्या 1520 कोटी गुंतवणुकीच्या प्रकल्पाला मान्यता
अमरावती व नागपूर विभागात वस्त्रोद्योगसंदर्भातील 2500 कोटीच्या प्रकल्पांना मान्यता
चंद्रपूरात 20 हजार कोटी गुंतवणुकीचा हरित तंत्रज्ञानावर आधारित मे. न्युईरा क्लिनटेक सोल्युशन्स प्रा. लि. चा कोल गॅसिफिकेशन प्रकल्प
निप्रो फार्मा पॅकेजिंग इंडिया ही कंपनी पुणे जिह्यामध्ये नवीन तंत्रज्ञानावर आधारित वैद्यकीय उत्पादनांच्या उत्पादन निर्मितीकरिता 1650 कोटीची गुंतवणूक रिलायन्सच्या 4206 कोटी गुंतवणुकीस मान्यता.