बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा इशारा, तामिळनाडूत शाळांना सुट्टी, महाराष्ट्रात काय स्थिती? - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा इशारा, तामिळनाडूत शाळांना सुट्टी, महाराष्ट्रात काय स्थिती?

दि.08 डिसेंबर 2022

Vidarbha News India - VNI

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा इशारा, तामिळनाडूत शाळांना सुट्टी, महाराष्ट्रात काय स्थिती?

विदर्भ न्यूज इंडिया

सध्या वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची (Cyclone) स्थिती निर्माण झाली आहे.

या स्थितीमुळं तामिळनाडू (Tamilnadu) आणि पुद्दुचेरीमध्ये (Puducherry) मध्यम ते जोरदार पावसाचा (Rain) अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे. हवामान विभागानं तामिळनाडू राज्यातील अनेक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये आज (8 डिसेंबर) शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चक्रीवादळाच्या स्थितीमुळं महाराष्ट्रात थंडीचा जोर कमी होणार आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. त्यामुळं चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत चक्रीवादळ आज उत्तर तामिळनाडूसह, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हे वादळ गेल्या सहा तासांत ताशी 10 किलोमीटर वेगाने पश्चिम-वायव्य दिशेने सरकले आहे.

आज तामिळनाडूनत (Tamilnadu) ऑरेंज अलर्ट जारी, शाळांना सुट्टी जाहीर

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज तामिळनाडूच्या 13 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर शुक्रवारी 12 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीची शक्यता आहे. तमिळनाडूतील तिरुवरूर आणि तंजावर जिल्ह्यात पावसाच्या इशाऱ्यामुळं आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

10 डिसेंबरला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ

हे वादळ पश्चिम-वायव्य दिशेने सरकत आहे. याचे हळूहळू चक्रीवादळात रूपांतर होत आहे. आज हे वादळ नैऋत्य बंगालचा उपसागर, उत्तर तामिळनाडू-पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनार्‍यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यानंतर ते तामिळनाडू, पुद्दुचेरी ओलांडून 10 डिसेंबरला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकेल. या दरम्यान वाऱ्याचा वेग 65 किमी प्रतितास ते 85 किमी प्रतितास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती

बंगालच्या उपसागरात तयार होणारं चक्रीवादळ सध्या ईशान्य मान्सूनच्या नेहमीसारख्या घडणाऱ्या नैसर्गिक प्रक्रियेसारखे पूर्व-पश्चिम साधारण 15 डिग्री अक्षवृत्त दरम्यान आग्नेयेकडून वायव्येकडे जात आहे. त्यामुळं त्याचा महाराष्ट्रावर विशेष असा काही परिणाम होण्याची शक्यता जाणवणार नाही. याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. चक्रीवादळ वाऱ्याच्या घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरणाऱ्या स्थितीमुळं त्याच्या अतिबाहेरील परिघ-घेरातून महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येणाऱ्या आर्द्रतेच्या वक्रकार पट्ट्यातील 14 जिल्ह्यात आठवडाभर म्हणजे 9 ते 16 डिसेंबर दरम्यान ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे. वातावरणासहित उरध्व दिशेनं संवहनी प्रक्रियेतून तुरळक ठिकाणी अवकाळी बे-मोसमी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. चक्रीवादळाच्या स्थितीमुळं महाराष्ट्रात थंडीवर परिणाम होणार आहे. राज्यात सध्या असणारा थंडीचा जोर कमी होणार आहे. थंडीला कदाचित आठवडाभरच अटकाव होण्याची शक्यता जाणवत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->